पालम/अनीस खुरेशी
पालम शहरात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 98 वी सार्वजनिक जयंती मोठ्या थाटामाटाने हजारोच्या संख्येच्या उपस्थितीने साजरी करण्यात आली सकाळी 11 वाजता लाल झेंड्याचे ध्वजारोहण मा.तहसीलदार मॅडम तेजस्विनी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून पालम नगरपंचायत चे नगराध्यक्ष मा.जालिंदर हत्तीअंबिरे,उपाध्यक्ष मा.बालासाहेब रोकडे,नगरसेवक मा.लाल खा पठाण, नगरसेवक मा.अजीम खा पठाण,माजी सरपंच मा.लक्ष्मणराव रोकडे,नगरसेवक मा.उबेदुल्ला खा पठाण,नगरसेवक मा.संजयभाऊ थिट्टे, कृ.उ.बा. संचालक मा.संजय शेळके,आदी प्रमुख अतिथी उपस्थित होते .
दुपारी मिरवुणुकीचे उदघाटन .माजी उपनगराध्यक्ष मा.असदुल्ला खा पठाण यांच्या हस्ते करण्यात आले सोबत मोसिन खा पठाण हे उपस्थित होते .
संध्याकाळी सुभाष जोगदंड व ललिता सिरसाट यांचा समाज प्रबोधनपर गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला .
दुसऱ्या सत्रामध्ये दि.2 ऑगस्ट संध्याकाळी 8 वाजता व्याख्यानाचा कार्यक्रम मा.वसंतराव सिरस्कार काका राष्ट्रवादी कॉ.ता.अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते डॉ.संजयजी बालाघाटे सर,प्रा.अशोक लवटे सर,प्रमुख उपस्थिती गंगाधर शिंदे,रोहिदास लांडगे,माउली घोरपडे,फैसल चाऊस, सलमान खान पठाण,किशोर शेळके,आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल शिंदे यांनी केले, सूत्रसंचालन तानाजी शिंदे आणि आभारप्रदर्शन अजित शिंदे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती समितीचे मुख्यप्रवर्तक राहुल शिंदे,अध्यक्ष अजित शिंदे उपाध्यक्ष नागार्जुन वाघमारे,कोषाध्यक्ष सीताराम साळवे,सुनील ताटे,लखन शिंदे,अविनाश शिंदे,सुंदर साळवे,प्रकाश गालफाडे,रवीभाऊ उफ़ाडे,भैया शिंदे,दयानंद कदम,शरद शिंदे,तानाजी खंदारे,मनोज शिंदे,रामप्रसाद कदम,रामा शिंदे,रवी शिंदे,रमेश शिंदे,गजानन कांबळे,संजय शिंदे,संदीप लोंढे,अमोल शिंदे,कृष्णा खंदारे,रामा लोंढे,आदींनी परिश्रम घेतले .
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सोहळा चांगल्या प्रकारे साजरा व्हावा म्हणून सक्रिय असलेले पालम पोलीस प्रशासनाने चोक पोलीस बंदोबस्त ठेवला होता.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें