फिल्ड ऑफिसर करतात मनमानी.
पालम/अनीस खुरेशी
पालम शहरातील स्टेट बँके ऑफ इंडिया या शाखेला शाखा व्यवस्थापक नसल्याने ताळा ठोकून आंदोलन करण्यात आले.
स्टेट बँके ऑफ इंडिया या शाखेला शाखा व्यवस्थापक नसल्याने अनेक कामे खोळंबली आहे मागिल एप्रिल महिन्यापासून आज पर्यंत बॅकेला शाखा व्यवस्थापक नसल्याने शेतकऱ्यांना पिक कर्जापासुन वंचित राहावे लागत आहे.शाखा व्यवस्थापक नसल्याने फिल्ड ऑफिसर शाखा चालवत आहे हे कर्मचारी मनमानी करून त्यांच्या फिल्डमधील लोकांच्या विचाराने कारभार चालवतात दलालांनी केलेल्या लोकांनाच पिक कर्ज मिळते बॅकेत पिक कर्जासाठी फाईल सिरियल नंबरा प्रमाणे आल्यास फिल्ड ऑफीसर दलाला भेटा काम होऊन जाईल अशी माहिती देऊन डावलण्याचा प्रयत्न करतात.नेमकी पेरणी येताच पहिले अधिकारी स्वइच्छेने बद्दली करून एका वर्षाच्या आत करून जातात त्यांचा चार्ज फिल्ड ऑफीसरकडे सोपवला जातो फिल्ड ऑफीसरच्या मनमानीमूळे मागिल वर्षाचे जि.उदोग केंद्राकडून सुशिक्षित बेरोजगार फाईली धुळखात पडल्या आहेत सुशिक्षित बेरोजगार तातडीने कर्ज वाटप करावे तसेच फिल्ड ऑफीसरची चौकशी करावी प्रतेक बाबीची फलके लावून जनजागृती करावी गाववाईज याद्या ग्रामपंचायत मध्ये लावावे शेतकरी बापाचा वाया जाणारा वेळ होणारी ससेहोलपट थांबवून प्रत्येकी समान व्यवहार करण्यास बॅक शाखेकडून व्यवस्था व्हावी आदी मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पालम शाखेच्या वतीने शुक्रवार स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेला ताळा ठोकून प्रशासनाचे निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्याचे ठाकूर अंबादास सखाराम,सादेख खुरेशी,शेषराव माहेणाजी,शेख बशीर,स.इस्माईल,अर्चना ठाकूर,बालाजी माळवटकर,पंडीत धुळगुंडे,राम कदम, राठोड लक्ष्मण,सुंदर गाणार,उत्तम राव गिणगिणेसह आदि शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते पालम पोलीस स्टेशन तर्फे तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता या वेळी पोलीस निरीक्षक शर्मा,पोलीस उपनिरीक्षक तरडे व माजी सरपंच गजानन ज्ञानराज रोकडे (माली पाटिल) यानी मध्यस्थी करून आंदोलनाची कोडी सोडली.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें