सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२७ऑगस्ट २०१८
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी गौतम एकनाथ साळवे याने स्वा.रा.ती.म.विद्यापीठ नांदेडच्या आंतरमहाविद्यालयीन जलतरण स्पर्धेत १०० व २००मिटर बटरफ्लाय प्रकारात द्वित्तीय क्रमांक मिळवला. ही स्पर्धा दि. २६ आॅगस्ट रोजी शाहीर अण्णा भाऊ साठे महाविद्यालय मुखेड येथे पार पडली.
येथील कै.रमेश वरपूडकर महाविद्यालयाचा बी.ए.तृतीय वर्षाचा विद्यार्थी गौतम एकनाथ साळवे हा दुर्दम्य आशावाद व कठोर प्रयत्न तसेच क्रीडा संचालक व क्रीडा समितीच्या मार्गदर्शनाच्या बळावर गोदावरी नदीत सराव करून या स्पर्धेत यशस्वी ठरला आहे.
त्याने मिळवलेल्या या ऊत्तुंग यशाबद्दल हशिप्रमं चे अध्यक्ष परमेश्वर कदम, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.वसंत सातपुते, क्रिडा संचालक प्रा.गोविंद वाकणकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.सखाराम कदम यांच्यासह संपूर्ण क्रीडा समितीने त्यांचे अभिनंदन केले.
पुढील आंतरविद्यापीठीय स्पर्धा जैन विद्यापीठ कर्नाटक येथे होणार असून त्यात गौतम साळवे हा स्वारातीमवि नांदेडकडून स्पर्धक म्हणून सहभागी होत आहे. त्याबद्दल त्यास मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें