पिक कर्ज व बोंड अलीचे अनुदान तत्काल वाटप करा नसता.शिवसेनेचा त्रिव आंदोलनचा इशारा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 अगस्त 2018

पिक कर्ज व बोंड अलीचे अनुदान तत्काल वाटप करा नसता.शिवसेनेचा त्रिव आंदोलनचा इशारा.


अंबड ( प्रतिनिधी)  पिककर्ज वाटपात बँकेच्या होत असलेली दिरंगाई व बोंडअळी चे अनुदान देण्यात होत असलेली टाळाटाळ यामुळे शेतकऱ्यांना सोबत घेऊन  माजी आ .संतोष सांबरे यांनी अंबडमधील स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक च्या सर्व शाखांना भेटी देऊन बँकेच्या शाखाधिकारी  यांच्या शी चर्चा करून तात्काळ पीककर्ज व बोड अळीचे अनुदान वाटप करण्याचा सूचना दिल्या, तसेच नवीन शेतकऱ्यांना पीककर्ज देण्यात अडचणी येत असल्याने बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून पीककर्ज व आदी प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत नसता शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अशोक पाटील बर्डे, युवासेना तालुका प्रमुख सिद्धेश्वर उबाळे, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष अनिस तांबोळी, शहर अध्यक्ष सगीर शेख, विभाग प्रमुख परमेश्वर वाघूडे, शिवाजी तारडे,प्रल्हादराव डूबल ,काकासाहेब मुळे, विजय टकले, दादाराव कोहले,धर्मराज बर्डे, जिनेद्र जैन, सुरेश राजपूत,विकास साबळे,यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें