गुगळी धामणगाव येथे युवकाचा मुंडन करून शासनाचा निषेध. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 6 अगस्त 2018

गुगळी धामणगाव येथे युवकाचा मुंडन करून शासनाचा निषेध.



सेलू :- मराठा क्रांती ठोक मोर्चाला दिवसें दिवस पाठिंबा वाढत असून रविवारी सेलू तालुक्यातील गुगळी धामणगाव येथे मराठा तरूणांनी मुंडन करून भाजप सरकारचा निषेध व्यक्त केला.

सेलू तालुक्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. वर्षभरात लाखोंच्या संख्येत 58 मुक मोर्चे निघाले मात्र भाजपच्या सरकारने आरक्षणा संदर्भात कोणतेही ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे मराठा समाजाला ठोक मोर्चे काढावे लागले. गेल्या पंधरा दिवसात तालुक्यात रास्ता रोको, धरणे, जलसमाधी यासारखे विविध आंदोलने करण्यात आली. तहसील कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. शासन यावर तोडगा काढायला तयार नाही. दिवसेंदिवस आंदोलन उग्र रूप धारण करत आहे. परवा तालुक्यातील डिग्रसवाडी येथे अनंत लेवडे या 24 वर्षीय तरूणाने आरक्षण मिळावे म्हणून अंगावर राॅकल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. मात्र शासन अजूनही वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे तालुक्यातील गुगळी धामणगाव येथील तरूणांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें