"याद - ए - रफी"मोहम्मद रफी यांच्या आठवणींना उजाळा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 6 अगस्त 2018

"याद - ए - रफी"मोहम्मद रफी यांच्या आठवणींना उजाळा.


मोहम्मद रफी यांच्या पुण्यस्मणा निमित्त विशेष उपक्रम.


सेलू ÷दि. ५ ऑगस्ट रविवार रोजी सायंकाळी ७ वाजता ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्या ३८ व्या पुण्यस्मणा निमित्त शहरातील नवरत्न म्युजिकल ड्रीम च्या वतीणे जुन्या व नव्या गीतांची रंगली मैफील,

या कार्यक्रमाचे आयोजन शहरातील निवृत्त उपविभागीय अभियंता प्रकाश काळबांडे यांच्या निवास स्थानी पार पडला.

कार्यकमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते सुनिल गायकवाड यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.

तर प्रमुख पाहुणे म्हणून रमेश दौड, विवेक सोन्नेकर,अॅड सुभाष भरदम,  सतीश जाधव, शेख मुखीद, गिरीश दिक्षित  आदींची  उपस्थिती होती.

मोहम्मद रफी यांच्या सह किशोर कुमार आणि मुकेश यांच्या स्मृतींनाउजाळा दिला.

या कार्यक्रमात प्रकाश काळबांडे यांनी प्यार की मंजिल मस्त सफर हर चेहरा यहा चांद, सौ अनघा पांडे तोरा मन दरपन कलाहे, जाकेर लाला ओ मेरी महेबूबा , डाॅ जफर फारूखी मेरे नयना संतोष कुलकर्णी चला जाता हू किसी धुन मे सुरेंद्र दिशागत कही दूर जब दिन ढल जाय तसेच बालासाहेब सोनटक्के, , सतीश ताठे. मोहन परदेशी. सर्जेराव लोकरे, गायत्री कुलकर्णी, पुजा खरात, पंकज लांडगे, ईत्यादी गायक कलाकारांनी एका पेक्षा एक गिते सादर केली.
कार्यक्रमास जेष्ठ नागरिक, व केशवराज बाबासाहेब नगर मधील नागरीक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रकाश काळबांडे तर सुत्रसंचलण जयश्री सोंनेकर डाॅ जफर फारूखी यांनी आभार मानले .
या कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी पुष्पा काळबांडे, सिमा काळबांडे, ज्योति काळबांडे, प्रविण काळबांडे, प्रनव काळबांडे यांनी अथक परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें