अहमदनगर प्रतिनिधी:-
प्रेषित मुहंमद साहेब (स.अ.व.स.) यांनी म्हटल्या प्रमाणे " साहित्यिकाच्या लेखणीची शाई ही शहिदांच्या रक्तापेक्षा ही पवित्र असते " असे विचार शकील जाफरी यांनी व्यक्त केले.
शकील जाफरी यांना मिळालेल्या 'साहित्य गौरव पुरस्काराच्या' आपल्या गौरवाला उत्तर देतांना ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की " प्रत्येक साहित्यिकाने लेखणीच्या या पावित्र्यतेला जपण्याचा प्रयत्न करावे "
मंचर येथील साहित्यिक आणि बहुभाषिक कवी मो. शकील जाफरी यांना नुकताच पुणे येथे "साहित्य गौरव पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले.
साहित्य सेवे साठी दिला जाणारा सदर पुरस्कार शकील जाफरी यांना त्यांच्या वैचारिक लेख संग्रह "इस्लाम : समज - गैर समज" या मराठी पुस्तकासाठी देऊन सन्मानित करण्यात आले.
शकील जाफरी हे सामाजिक कार्यकर्ते, जादूगार, बहुभाषिक कवी, व्याख्याते आणि साहित्यक म्हणून मंचर पंचक्रोशीत सुपरिचित आहेत. शकील जाफरी हे अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण, एड्स जनजागृती आणि राष्ट्रीय एकात्मता या सारख्या अनेक विषयांवर 1988 पासून जनजागृती कार्य करत आहेत.
वेद शास्त्रोत्तेजक सभागृह, सादाशिव पेठ येथे "साहित्य गौरव" या संस्थेने आयोजित केलेल्या 7व्या साहित्य संमेलनात सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. वंदना धर्माधिकारी हे होते तर संस्थेच्या अध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर, विजय कुमार मर्लेचा, पंडित दीपक शर्मा, डॉ. रत्ना चौदरी आणि प्रकाश साठे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन अपर्णा आंबेडकर यांनी केले तर डॉ. मंदाताई नाईक यांनी स्वागत केले आणि डॉ. सुधीर कुलाल यांनी आभार प्रदर्शन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें