सोनपेठ (राजेश खेडकर) दि. ०६अॉगस्ट २०१८
तालुक्यातील मौ.वाणीसंगम येथे शुल्लक कारणावरून दि. ०४ व ०५ अॉगस्ट रोजी मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. या मारहाण प्रकरणी बारा जनांविरूध्द सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या विषयी अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मौजे वाणीसंगम येथील अशोक काळे यांना गावातील विरोबा काळे यांनी फोनवरून शिवीगाळ केल्याची घटना ०३ अॉगस्ट रोजी घडली होती, त्यानंतर ०४ अॉगस्ट रोजी अशोक काळे, नागोराव काळे व विलास काळे हे सर्व विरोबा काळे यांच्या घराकडे समजून सांगण्यासाठी गेले होते. यावेळी वाद होऊन हाणामारीची घटना घडली. यात अशोक काळे यांच्या सह इतर काहीजण जखमी झाले. जखमींना उपचारा साठी अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर ०५ अॉगस्ट रोजी अशोक काळे हे सोनपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या साठी आले होते. परंतु झालेले प्रकरण मिटवून घेऊ असे आनोबा काळे यांनी सांगितल्यानंतर अशोक काळे हे गावाकडे परत जात होते. दुपारी ०२.३०च्या सुमारास त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये अशोक काळे व काहीजण जखमी झाले, असे फिर्यादीत अशोक काळे यांनी म्हटले आहे.
अशोक काळे यांच्या फिर्यादीवरून आनेबा काळे, नारायण काळे, ज्ञानोबा काळे, विरोबा काळे, गंगाधर काळे, शारदा काळे, अनुसया काळे, सीता काळे, विमल काळे हे सर्व राहणार वाणीसंगम व अन्य तीन पाहुणे असे सर्व बारा जनांविरूध्द सोनपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें