मानवत / मुस्तखीम बेलदार.
दि.०६ : मानवत नगरपरिषद च्या नगराध्यक्षपदाचा पदभार सौ.राणी अंकुश लाड यांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने आज दि.०६ जुलैरोजी स्वीकारला आहे.
मानवत नगरपरिषदचे नगराध्यक्षा शिवकन्या नंदकुमार स्वामी यांचे कार्यकारी दंडाधिकारी परतुर जि.जालना यांनी दिलेले दि.२२ सप्टेंबर १९९२ रोजीचे मालाजंगम (अनुसुचित जाती) चे प्रमाणपञ हे अवैध ठरविण्यात आले असल्याने पडताळणी समितीच्या दि.२१ जुलै २०१८ च्या निर्णयाच्या दिनांकापासुन श्रीमती शिवकन्या स्वामी यांना नगराध्यक्ष पदावर राहण्यासाठी मा.जिल्हाधिकारी परभणी यांनी अनर्ह ठरविण्यात आले असल्याने मानवत नगरअध्यक्ष पदाचा पदभार विद्यमान उपनगराध्यक्षा सौ.राणीताई अंकुश लाड यांना नगरअध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते यासाठी आज नगरपरिषद येथे सौ.राणीताई अंकुश लाड यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने स्विकारला आहे.
तसेच मानवत नगरपरिषदने स्वच्छ सर्वक्षण २०१८ मध्ये सहभाग घेतला होता त्यात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल देशात ५६ वा क्रमांक पटकावला होता त्यामुळे मानवत नगरपरीषदेस ५ कोटि रुपयाचे पारीतोषीक जाहिर झाले होते या दृष्टीने मानवत शहर स्वच्छ शहर सुंदर शहर बनविण्याचा संक्लप केल्यामुळे नगरपरिषद अंतर्गत शहरात साफसफाई ची अमलबजावणी काटेकोरपणे व्हावी म्हणुन ४ नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आल्या व त्याचा लोकार्पण सोहळा मा.अध्यक्षा सौ.राणीताई अंकुश लाड यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी कार्यदक्ष मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,बाबुरावजी हालणोर ,गणेश कुमावत ,मोहन लाड,दत्ता चौधरी,विनोद रहाटे ,दिपक बारहाते,किरण बारहाते,लेखापाल एस.एस.बोरेवाड ,प्रशासकिय सेवक उबेद चाऊस यांच्यासह नगरपरिषद चे सर्व कर्मचारि व नागरिक उपस्थीत होते यावेळी नगराध्यक्षपदी सौ.राणीताई अंकुश लाड यांनी पदभार स्विकारल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढिल कार्याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें