कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात स्वागत समारंभ,ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी-डॉ. वंगे. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 अगस्त 2018

कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात स्वागत समारंभ,ध्येय समोर ठेवून वाटचाल करावी-डॉ. वंगे.




सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२४ऑगस्ट २०१८
येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात दि.२४ ऑगष्ट रोजी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने स्वागत समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम, प्रमुख मार्गदर्शक डॉ. हरिश्चंद्र वंगे, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक इरफान शेख, प्रमुख पाहूणे पत्रकार बाबासाहेब गर्जे, यांच्यासह प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्रा.डॉ.मुकुंदराज पाटील आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयाच्या २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांचा स्वागत समारोह आज आयोजीत करण्यात आला होता. या निमित्ताने प्राचार्य डॉ. वसंत सातपुते यांनी प्रथम विद्यार्थ्यांचे स्वागत करत विद्यार्थ्यांनी अभ्यासाला महत्त्व द्यावे असे मत व्यक्त केले. महाराष्ट्र  ग्रामीण बँक  व्यवस्थापक शेख यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्याचे हे वय असून; गांभिर्यांने अभ्यास कराल तर यशस्वी व्हाल, दुर्लक्ष कराल तर पश्चाताप कराल असे मत व्यक्त केले. तर मुख्य मार्गदर्शक डॉ. हरिश्चंद्र वंगे यांंनी ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी म्हणजे जीवन भरकटणार नाही, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात हशिप्रमंचे अध्यक्ष परमेश्वर कदम यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी संस्था प्रयत्न करत आहे, या प्रयत्नाला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून यापुढे आणखी जोमाने प्रयत्न केले जातील असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी लवकरच सांस्कृतिक सभागृह हशिप्रमंच्या वतीने उभारण्यात येईल असे आश्वासन दिले.
या प्रसंगी प्रज्ञा विशेषांकाचे विमोचन, ग्रंथपाल प्रा. आनंत सरकाळे यांना पी. एच् डी. मिळाल्याबद्दल सत्कार, रामेश्वर कदम यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रंथालयास ग्रंथभेट देण्यात आली, गुणवंताना बक्षीसे देऊन सत्कारीत करण्यात आले, अविनाश आगळे, कन्याकुमारी भोसले, निता भोसले यांनी मनोगते व्यक्त केले.
सुत्रसंचालन प्रा. डॉ. मुक्ता सोमवंशी यांनी केले तर आभार अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. डॉ. मुकुंदराज पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें