विवाहितेची आत्महत्या पती सह सासरच्या मंडळी विरूध्द गुन्हा दाखल. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शुक्रवार, 24 अगस्त 2018

विवाहितेची आत्महत्या पती सह सासरच्या मंडळी विरूध्द गुन्हा दाखल.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२४ऑगस्ट २०१८

तालुक्यातील बोंदरगाव येथील विवाहिता काजल ज्ञानेश्वर पानखडे (२२ वर्ष) हिने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२३ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता घडली. विवाहितेच्या आईच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरूध्द सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
एक वर्षापुर्वी काजल हिचा विवाह ज्ञानेश्वर पानखडे याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर काजलला कांही दिवस सासरच्या लोकांनी चांगले नांदवले, परंतु त्यानंतर विवाहितेच्या चारीञ्यावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करून शारीरिक व मानसिक ञास देण्यास सुरूवात केली. सोमवारी विवाहिता काजल हिने माहेरी फोन करून सांगितले की सासरचे लोक खुप ञास देत आहेत मला घेऊन जा असे कळविले. तद्नंतर मुलगी काजलच्या सासरच्या मंडळेकडून दि. २३ ऑगस्ट रोजी काजल हिने आत्महत्या केल्याची माहिती  दिली असे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. विवाहितेची आई शोभा ढोणे रा. मंगरूळ ता. कळंब यांच्या फिर्यादीवरून पती ज्ञानेश्वर पानखडे, सासू रेणूका पानखडे, सासरा लक्ष्मण पानखडे, व ननंद उषा करडूले सर्व रा. बोंदरगाव यांच्या विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास फौजदार संतोष मुपडे हे करत आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें