सोनपेठ (राजेश खेडकर) दि.०७ऑगस्ट २०१८
सोनपेठ येथील कै.र.व.महाविद्यालयाच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ संलग्नित राष्ट्रीय सेवा योजना समितीच्या सल्लागारपदी ग्रामीण विटा खु.चे मदन विटेकर माजी सभापती तर शहरी किरण स्वामी (संपादक साप्ताहिक सोनपेठ दर्शन) यांची नियुक्ती झाली. याबाबतचे अधिकृत नियुक्ती पत्र समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.वसंत सातपुते व कार्यक्रमाधिकारी डॉ.मारोती कच्छवे आणि डॉ.बाबुराव आंधळे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे. या समितीवर महाविद्यालयाचे प्रा.डॉ.सुनिता टेंगसे, प्रा.डॉ.अनंत सरकाळे व प्रा.विकास रागोले यांची सल्लागार सदस्यपदी नियुक्ती केली असून हि नियुक्ती सन २०१८-१९ ते २०२०-२१ या सलग तीन वर्षा साठी आहे.
या नियुक्तीचे माजी आमदार व्यंकटराव कदम, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर, संस्था अध्यक्ष परमेश्वर कदम, सोनपेठ तालुका मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष बाबासाहेब गर्जे व सर्व सदस्य तसेच वितरक संघटनेचे अध्यक्ष रामेश्वर पोटे व सर्व सदस्य, प्राध्यापक, प्राध्यापिका, कर्मचारी वर्ग आदींनी स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या असून या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें