सिल्लोडला क्रांतिदिन व युवक काँग्रेस स्थापना दिन उत्साहात साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

सिल्लोडला क्रांतिदिन व युवक काँग्रेस स्थापना दिन उत्साहात साजरा.


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.०९ ) - काँग्रेस पक्षाच्या वतीने पक्ष कार्यालय गांधी भवन येथे ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त देशाच्या स्वातंत्र्य आंदोलन व लढ्यात मोलाची भूमिका बजविणारे व प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांना व महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याचप्रमाणे युवक काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा करतांना कार्यलयावर ध्वजारोहण करण्यात आले.

स्वतंत्र आंदोलनाच्या लढ्यात मोलाची भूमिका करतांना इंग्रजांना भारत छोडो म्हणणारे व इंग्रजांना भारतातून निघून जाण्यास भाग पाळणाऱ्या वीरांना व महामानवांच्या प्रतिमांना नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह काँग्रेसचे नंदकिशोर सहारे, शांतीलाल अग्रवाल, शंकरराव खांडवे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून क्रांतिदिनाच्या घोषणा देण्यात आल्या.युवक काँग्रेसचा स्थापना दिनानिमित्त कार्यलयावर ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी वीरांच्या व महामानवांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गानी स्वतंत्र आंदोलनाचा लढा कसा दिला तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना करून तू मुझे खून दो मै तुमहें आझादी दुगाचा नारा दिला त्याचप्रमाणे शाहिद भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी इन्कलाब जिंदाबादची फुंकार देऊन भारतीयांना इंग्रज विरुध्द लढा देण्यासाठी तयार केले.  त्यांच्या कार्याने प्रेरणा घेऊन स्वतंत्र आंदोलनाला यश आल्याची आठवण करून देतांना त्यांच्या कार्याची सदैव आठवण ठेवणे व त्यांच्या ध्येयवादी धोरणाने वागणे त्यांना खरे अभिवादन ठरेल असे उपस्थितांना सांगण्याचा प्रयत्न केला.
या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, जिल्हाउपाध्यक्ष नंदकिशोर सहारे, शांतीलाल अग्रवाल, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष रुपेश जैस्वाल, अमित आरके आदींनी आपले विचार मांडले.
या प्रसंगी नगरसेवक रऊफ बागवान, विठ्ठलराव सपकाळ, शेख मोहसीन, शंकरराव खांडवे, रईस पठाण मुजावर, सलीम हुसेन, सुनील दुधे, सत्तार हुसेन, बाजार समितीचे संचालक सतिष ताठे, ईशवर दिवटे, अर्जुन गाढे, संजय मुरकुटे, मतीन देशमुख, कुणाल सहारे, मनोहर आरके, अक्षय मगर, जगन्नाथ कुदळ, राजेश्वर आरके, फहिम पठाण, अमित कळम, संजय शिंदे, रविंद्र आरके, आबेद पठाण, जितेंद्र आरके यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें