मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०९: मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारलेल्या ९ अॉगस्ट रोजी महाराष्ट्र बंद ला मानवत शहरासह तालुक्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असुन शाळा महाविद्यालय आज बंद ठेवण्यात आले तसेच सकाळपासुनच व्यापाऱ्यानी आपले प्रतिष्ठाने कडकडीत बंद ठेवुन आपला पाठिंबा दिला सकल मराठा समाज बांधवाकडुन सकाळी दहा वाजल्यापासुनच तहसिल कार्यालय समोर पाथरी परभणी हायवेवर आंदोलकाकडुन आरक्षण च्या मागणीसाठी आपले प्राण त्याग करणाऱ्या मराठा बांधवासाठी यावेळी मौन पाळुन श्रध्दांजली वाहुन रास्तारोको करुन वाहतुक ठप्प करण्यात आली तालुक्यातील कोल्हा येथे रास्तारोको करुन म्हशीला पेंड खाऊ घालुन शासनाचा निषेध करण्यात आला व भजन किर्तन करण्यात आले तसेच केकरजवळा येथे हि रास्तारोको करण्यात आला व रुढिपाटि जवळ काट्याटाकुन जाळ करुन शासनाचा निषेध करण्यात आला बंदच्या पार्श्वभूमीवर महामंडळाने एस.टि.बस सकाळपासुनच बंद केल्याने प्रवाशाचे फार हाल झालेत आंदोलनकांनी ॲम्बल्युस वगळता एक हि वाहन सोडले नाही मानवतरोड रेल्वेस्टेशन येथुन मानवतकडे येणाऱ्या प्रवाशाना वाहन नसल्याने माञ पायी यावे लागले अडिच च्या सुमारास पावसाची सरी कोसळल्या त्यात हि आदोलनकारी ठामपणे पावसात उभे होते यावेळी पोलीस निरीक्षक मिना कर्डक यांनी चोख पोलीस बंदोबंस्त ठेवला होता मराठा आंदोलन तालुक्यात शांततेत पार पडले बातमी लिहिपर्यत कोणताही अणुचित घटना ची माहिती मिळाली नाही.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें