संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मराठा समाजाचा शांततेत बंद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

संगमनेर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात मराठा समाजाचा शांततेत बंद.


 आश्वी खु (प्रतिनिधी) अमोल राखपसरे
संगमनेर शहरासह तालुक्यातील आश्वी, वडगावपान, तळेगाव, घारगाव, साकुर आदि ग्रामीण भागात सकल मराठा समाज बाधंवाकडून ‘ मराठा आरक्षण ’ मागणीसाठी पुकारण्यात आलेला बंद शांततेत व अहिसंक मार्गाने पार पडला असून यामध्ये कोणतीही हिसंक घटना घडू नये यासाठी आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल कटके व कर्मचाऱ्यानी निमगावजाळी येथे जमलेल्या आंदोलकाशी संवादातून समन्वय साधत यशंस्वी शिष्टाई करत आंदोलकाचे निवेदन स्विकारले आहे. तर या महाराष्ट्र बंद आदोलनाला प्रवरा उद्योग समूह, अमृत उद्योग समुह, शैक्षणिक संस्था व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ऐ) आदिनी पाठीबां दिला होता.
मराठा समाजाला शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी ग्रामीण भागातील उंबरी-बाळापूर, आश्वी खुर्द, आश्वी बुद्रुक, निमगावजाळी, चिचंपूर, झरेकाठी, ओझर, पानोडी, शिबलापूर, सादतपूर, वडगावपान, राजापूर, पिपंरणे आदि गावानमधील मराठा समाज बांधवानी ‘ महाराष्ट्र बंद ’ च्या हाकेला प्रतिसाद देत शांततेच्या मार्गाने कडकडीत बंद पाळला. यावेळी पंचक्रोशीतील व्यापारी वर्गाने बंदला प्रतिसाद देत व्यापारीपेठा बंद ठेवल्या होत्या व आश्वी खुर्द येथिल आठवडे बाजार हि बंद ठेवण्यात आला होता. तर मांचीहिल शैक्षणिक संकुलासह परिसरातील सर्व शाळा बंद होत्या. गुरुवारी सकाळी कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील निमगावजाळी येथे सकल मराठा समाजाकडून चक्काजाम आंदोलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव उपस्थित होते. यासर्वानी शांततेच्या व अहिसेच्या मार्गाने आंदोलन करत आश्वी पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांना मराठा समाजाच्या मागण्याचे निवेदन दिले.
यावेळी तालुक्याच्या विविध भागात उपस्थित मराठा समाजाच्या वतीने अनेक मान्यवंरानी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की, मराठा समाज हा प्रामुख्याने शेतकरी वर्गातील असून त्याला दुष्काळ, अतिवृष्टी, अनिश्चित बाजारभाव व सरकारच्या उदासिन धोरणाचा फटका बसत असल्याने मराठा समाज हा अर्थिक विवंचनेत सापडला आहे. शैक्षणिक शुल्क भरमसाठ असल्याने मराठा समाजातील तरुणाना चागले शिक्षण घेता येत नसून नोकऱ्या मिळवण्यासाठी मराठा समाजातील तरुणाना संघर्ष करावा लागत आहे. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणानी आपले जीव गमावल्यामुळे तरुणांचा आता सरकारवर विश्‍वास राहिलेला नाही. त्यामुळे सरकारने आता मराठा समाजाचा अंत न पाहता लवकरात- लवकर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा. अशी एकमुखी मागणी केली. तर समाज बांधवांनी आत्महत्या न करता आंदोलन शांततेच्या मार्गाने करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. तालुक्यातील निमगावजाळी येथे आंदोलन व बंद शांतपणे पार पडावा यासाठी पोलिस निरिक्षक अनिल कटके व त्याच्या सहकाऱ्यानी आंदोलकाशी संवाद साधत चोख बंदोबस्त ठेवला होता.
पोलिसाचा संवाद व आंदोलक शांत..

निमगावजाळी येथिल कोल्हार घोटी राज्यमहामार्गावर चक्काजाम आंदोलनासाठी मराठा समाज बांधव जमले होते. यावेळी पोलिस निरिक्षक अनिल कटके यांनी आंदोलकाशी संवाद साधत प्रशासनाकडून मराठा आंदोलनाची दखल घेण्यात आली असून मराठा आरक्षणाची कायदेशीर प्रक्रीया सरकार दरबारी सुरु असल्याचे सांगितले. लवकरचं सरकार याबाबद योग्य तो निर्णय घेणार आहे. त्यामुळे जगाने दखल घेतलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला कोणीही हिसंक स्वरुप देऊन गालबोट लावू नये. असे आवाहन करताच आक्रमक झालेल्या तरुणानी शांततेच्या व अहिसेंच्या मार्गाने पोलिस निरिक्षक अनिल कटके यांना निवेदन दिले. दरम्यान ‘ महाराष्ट्र बंद ’ आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसाकडून आश्वी पंचक्रोशीतील गावानमध्ये अनेक बैठका घेत हिसंक आंदोलनाचे फायदे-तोटे तरुणाना समजुन सांगितले. वारवार परिसरातील नागरीक व कार्यकर्त्याशी समन्वय यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी हिसंक झालेले आंदोलन मात्र आश्वीसह पंचक्रोशीत शांतते पार पडले आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें