परभणी(समशेर खान)जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व परभणी जिल्हा फुटबॉल संघटना व डॉ झाकीर हुसेन हायस्कूल परभणी यांच्या वतीने दि.2 आँगस्ट रोजी शालेय जिल्हा सुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन फुटबॉल जिल्हा सचिव मंहमद इकबाल यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी जिल्हाक्रीडाधिकारी कलीमउद्दीन फारुखी ,जिल्हा शा.शि,शि संघटना अध्यक्ष रणजित काकडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरगावकर, जिल्हा सेपक टँकरा सचिव, गणेश माळवे, शंकर शहाणे, क्रीडाधिकारी शैलेंद्रसिंह गौतम, सुधीर चपळगावकर, ईश्वर गोस्वावी, प्रकाश होनवडजकर , रमेश खुणे,सतिश नावाडे यांची उपस्थित होते.
या स्पर्धा 15 व 17 वर्ष आतील.जिल्ह्यातील आठ प्रशालेच्या संघानी सहभाग नोंदवला
या प्रसंगी जिल्हाक्रीडाधिकारी म्हणाले शालेय क्रीडा स्पर्धा निर्माण झालेला खेळाडू जीवनात यशस्वी होऊ शकतो, कारण स्पर्धेतुन सांघिक भावना व शारीरिक क्षमता विकसित होते.
स्पर्धेत पंच म्हणून मुन्ना खाँन,बाबा तारेख, नईम तारेख, राजा, जुलाह खुदुस यांनी काम पाहिले,

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें