नांदेडमध्ये तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

रविवार, 5 अगस्त 2018

नांदेडमध्ये तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू.



नांदेडच्या कौठा भागात असलेल्या साईबाबा मंदिर जवळील गोदापात्रात पोहण्यास गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा आज दुपारी दोन वाजता बुडून मृत्यू झाला. जीवरक्षक दलाने या तिघांचा शोध घेवून त्यांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.शिवनगर भागातील शुभम गणेश जाधव (१२), आनंद मारोती केंद्रे (१५), शुभंम संजय जगताप (१५) हे तिघेजण गोदावरी नदीकाठावर साईबाबा मंदिराजवळ असलेल्या पात्रात पोहण्यास गेले होते. शाळेतून परत आल्यानंतर त्यांनी आपले दप्तर काठावर ठेवले आणि  पोहण्यास गेले. आज दुपारी दोन वाजता ते नदीपात्रात गेले. मात्र त्याठिकाणी असलेल्या मोठ्या डोहाचा त्यांना अंदाज आला नाही. त्यामुळे पाण्याचा अंदाज न लागल्याने या तिघांचाही बुडून मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची खबर लागताच त्यांनी गोदावरी जीवरक्षक दलाला पाचारण केले. सय्यद नूर इकबाल व त्यांच्या  पथकाने गोदावरी पात्रात शोधाशोध सुरु केली आणि एका तासातच त्यांचे मृतदेह तराफ्यावरुन बाहेर काढले. या तिघांचाही मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्वांचे दप्तर गोदावरी काठावरच मिळाले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून, शिवनगर भागातील राहणाऱ्या या तिन्ही शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना लगेच पाचारण केले. उत्तरीय तपासणीनंतर त्यांचे मृतदेह आज सायंकाळी त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येतील, असे पोलिसांनी सांगितले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें