आता फोनवरून वैद्यकीय सल्ला देणं बंद, आयएमएच्या सूचना.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आता राज्यातल्या डॉक्टरांनी फोनवरून सल्ला देणं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण अशा फोनवरून दिलेल्या सल्ल्याने कधी कधी रुग्णाचा जीव जाऊ शकतो आणि त्यामुळे डॉक्टरचे संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. याबाबत इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागाने राज्यातल्या सर्व डॉक्टर्सना इशारा दिला आहे.फोनवरून सल्ला दिल्याने रुग्णाच्या जिवावर बेतल्याचे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात दाखल झाले होते. रत्नागिरीतल्या एका डॉक्टर दांपत्याला उपचारा दरम्यान हलगर्जीपणा केल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्या याचिकेवर सुनावणी करताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र विभागामार्फत राज्यातल्या सर्व डॉक्टर्सना परिपत्रक काढून मोबाईलवरून रुग्णाला सेल्ला देणं बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र एखाद्या वेळेस आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्ण गंभीर असेल आणि त्याची संपूर्ण वैद्यकीय पार्श्वभूमी संबंधित डॉक्टरला माहिती असेल तरच फोनवरून सल्ला देण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे.फेब्रुवारी महिन्यात रत्नागिरीतल्या डॉक्टर दीपा पावसकर आणि डॉक्टर संदीप पावसकर यांच्या रुग्णालयात एका महिलेची प्रसुती होऊन तिला घरी सोडण्यात आले होते. मात्र घरी गेल्यानंतर तिची प्रकृती बिघडल्याचे तिच्या कुटुंबीयांनी डॉ. दीपा यांना फोन करून सांगितले. त्यावेळी डॉ. दीपा यांनी फोनवरूनच मेडिकल स्टोअर्समधून औषध घ्यायला सांगितलं होतं.डॉ दीपा यांनी सांगितलेले औषध घेतल्यानंतर महिलेची प्रकृती आणखीनच बिघडली. त्यामुळे पुन्हा डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली. तेव्हा डॉक्टरांनी तिला त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेलं असता डॉक्टर दीपा किंवा डॉक्टर संदीप पावसकर हे दोघंही रुग्णालयात उपस्थित नव्हते. परिस्थिती गंभीर असल्यानंतरही पावसकर दांपत्य फोनवरूनच संबंधित महिलेवर उपचाराबाबत सल्ला देत राहिले. दुसऱ्या दिवशी मात्र या महिलेच्या प्रकृतीत सुधारणा होण्याऐवजी आणखीनच खालावल्याने तिला दुसऱ्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र दुर्दैवाने तिचा मृत्यू झाला.या प्रकरणी डॉक्टर दीपा पावसकर आणि डॉक्टर संदीप पावसकर या डॉक्टर दांपत्या विरोधात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे महाराष्ट्र विभागा मार्फत राज्यातल्या सर्व डॉक्टर्सना परिपत्रक काढून मोबाईलवरून रुग्णाला सेल्ला देणं बंद करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें