सेलू प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलू दि.04/08/2018रोजी भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जि. अध्यक्षा प्रा. रेखाताई ढगे यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह सेलु येथे महिला आघाडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करून पक्षाची भुमिका विषद करण्यात आली. या बैठकीला सेलू तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील बहुसंख्य महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते व सर्वांच्या सहमतीने प्रमिलाताई धापसे यांची सेलू महिला आघाडी तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. व त्यांना महिला जिल्हा अध्यक्षा प्रा. रेखाताई ढगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भारिप चे माजी जिल्हा अध्यक्ष धम्मपाल सोनटक्के, एन. जी. खंदारे, अरूण गिरी, एस. एस. ढगे, संपतराव नंद , बुवाजी निकाळजे, अमोल वाघमारे ईत्यादींनी मार्गमार्गदर्शन केले.
निवड करण्यात आलेली महिला कार्यकारिणी खालीलप्रमाणे.
अध्यक्षा -प्रमिलाताई धापसे, ऊपाअधक्षा -कांताबाई जाधव, सचिव -मथुराबाई धापसे, सहसचिव -हौसाबाई सातसमुंदरे
तसेच यावेळी भारिप चे सेलू तालुका अध्यक्ष बुवाजी निकाळजे यांनी सेलू युवा शहर अध्यक्ष -विलास कांबळे, युवा शहर ऊपाअधक्ष -दतराव वाघमारे, युवा तालुका सरचिटणीस -भिमराव गोटे, युवा सचिव -राना प्रताप भदरगे , युवा सहसचिव -विजय सुतारे, सिद्धार्थ वाघमारे यांची निवड केली. तसेच गंगासागर रनविर , ऊषाताई कलंबरकर , सुनिताताई लोखंडे, रेखाताई खंदारे, भिमराव गोटे, विकास निसर्गन , नितीन निसर्गन , राजेश हिवाळे, समाधान भदरगे, दिलीप वाघमारे, विष्णू ढोले, गौतम वाघमारे, अमोल भदरगे, नितीन वाघमारे, लहुजी वाघमारे,भिमराव लाटे सनी साळवे, सुमन साळवे, गणेश मेहर ईत्यादी पदाधिकारी, महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच संतोष हिवाळे, शाम गायकवाड, अजय धापसे, सुदाम निसर्गन ईत्यादींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बुवाजी निकाळजे यांनी केले तर आभार राजेंद्र दुधवडे यांनी मानले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें