मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०६: मानवत नगरपरिषदेने स्वच्छ सर्वक्षण २०१८ मध्ये मा.आमदार मोहनरावजी फड व युवानेते डॉ.अंकुश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला होता व नगरपरिषद चे मुख्याधिकारी उमेश ढाकणे व त्यांच्या कर्मचारि यांनी शहरात स्वच्छतेबाबत नागरीकात जनजागृती करत मोठ्या मेहनतीने कार्य केले होते यात उत्कृष्ट कामगीरी केल्याबद्दल देशात ५६ वा स्वच्छतेत नगरपरिषद ने क्रमांक पटकावला होता त्यामुळे मानवत नगरपरीषदेस ५ कोटि रुपयाचे पारीतोषीक जाहिर झाले होते या दृष्टीने मानवत शहर स्वच्छ शहर सुंदर शहर बनविण्याचा संकल्प केल्यामुळे नगरपरिषद अंतर्गत शहरात साफसफाई ची अमलबजावणी काटेकोरपणे व्हावी म्हणुन ४ नवीन घंटागाडी खरेदी करण्यात आल्या व त्याचा लोकार्पण सोहळा आज दि.०६ अॉगस्ट रोजी नवनिर्वाचित माननीय नगराध्यक्षा सौ.राणीताई अंकुश लाड यांच्याहस्ते करण्यात .आले यावेळी युवानेते डॉ.अंकुश लाड,मुख्याधिकारी उमेश ढाकणे ,नगरसेवक बाबुरावजी हालणोर ,गणेश कुमावत ,मोहन लाड,दत्ता चौधरी,विनोद रहाटे ,दिपक बारहाते,किरण बारहाते,लेखापाल एस.एस.बोरेवाड ,प्रशासकिय सेवक उबेद चाऊस,नगर अभियंता अनवर शेख ,अनीस बेलदार,हबीब भडके ,सय्यद कलीम यांच्यासह नगरपरिषद चे कर्मचारि उपस्थीत होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें