सेलूत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर, नगरपालिका प्रशासनाचा नुसता देखावा.प्लास्टिक बंदीची बैठक ठरली व्यापाऱ्यांची डोकेदुखी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 अगस्त 2018

सेलूत प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर, नगरपालिका प्रशासनाचा नुसता देखावा.प्लास्टिक बंदीची बैठक ठरली व्यापाऱ्यांची डोकेदुखी.


सेलू प्रतिनिधी शमशेर खान

शासनाच्यावतीने मोठा गाजावाजा करुन प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे तसेच शासनाकडून व नगरपालिका प्रशासनाकडून याविषयी जनजागृती करण्यात आली आहे मात्र अद्यापही कोणत्याही व्यापार्‍यावर नगरपालिका प्रशासनाने कारवाई केलेली नाही सेलू येथील स्थिती पाहिल्यावर लक्षात येते नगरपालिका प्रशासनाने तीन ते चार दिवसा प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान 2018 यासंदर्भात सेलू शहरांमध्ये हॅन्ड बिल वाटप करण्यात आले पण अद्यापही नगरपालिका प्रशासनाने कोणत्याही व्यापाऱ्यांवर कारवाई केलेली नाही यामध्ये प्रमुख चौकात बस स्थानकावर भाजी मार्केटमध्ये किराणा मार्केट नूतन रोड केशवराज बाबासाहेब मार्ग येथील व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर करत असून अद्यापही नगरपालिका प्रशासनाची प्लास्टिक व थर्माकोल बंदी नावालाच असल्याची चर्चा सेलू शहरांमधून होत आहे
पर्यावरणाला ानीकारक ठरणार्‍या प्लास्टिक पिशव्या वर बंदी घालण्यात आली आहे याकरिता कारवाईची उदासीनता मात्र दिसून येत आहे ही बंदी कागदोपत्रीच राहते की काय असा सवाल सेलू शहरातील जाणकार व्यक्तीकडून होत आहे सेलु शहरात भाजीपाला कापड रेडीमेड डेली नीड्स किराणा कटलरी मार्केट मिठाई मोबाईल शॉपी हॉटेल हार्डवेअर फेरीवाले फूलवाले भाजीपाला विक्रेता फळ फ्रुट विक्रेता यांच्याकडे सरास प्लास्टिक पिशव्यांचा वापर होत असून एका प्रकारे नगरपालिकेने व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्या वापरण्याची जणूकाही परवानगीच दिली आहे असे चित्र सेलु शहरात पाहावयास मिळत आहे पालिका प्रशासनामध्ये नगराध्यक्षाच्या अंतर्गत जी बैठक बोलवण्यात आली होती त्या बैठकीमध्ये 24 जुलै रोजी दुपारी बारा वाजता घेण्यात आलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांना प्लास्टिक पिशव्यावर बंदी मध्ये ते मार्गदर्शन करण्यात आले होते ती बैठक उलटून आज एक आठवडा होऊन अद्यापही एकाही व्यापाऱ्यांवर कारवाई झाल्याचे चित्र नगरपालिका प्रशासनाकडून दिसत आहे या बैठकीमध्ये झालेली चर्चेअंती व्यापाऱ्यांनी प्रत्येक असोसिएशनच्या वतीने नगरपालिकेला दोन ते तीन केसेस देण्याचे ठरल्याची चर्चा मात्र शहरात सुरू होती या चर्चेअंती काही व्यापाऱ्यांनी ोन ते तीन व्यापार्‍यावर पाच हजार रुपयाचा दंड एका व्यापाऱ्यावरपडू नये यासाठी सर्वच व्यापाऱ्याकडून काही ना काही तरी चंदा गोळा करण्यात आला यामुळे प्रत्येक असोसिएशन तर्फे दोन ते तीन केसेस देण्याचे नगरपालिका प्रशासनाला ठरल्यामुळे पालिका प्रशासनाने खुलेआम प्लास्टिक वापर करण्याचे सांगितले असल्याची चर्चा शहरात आहे या चर्चेमुळे व्यापाऱ्याला प्लास्टिक बंदी विषयी कोणतीच भीती राहिली नसल्याचे चित्र सेलु शहरात दिसत आहे यामुळे शहरातील पालिका प्रशासनाचे व्यापार्यांचे मन मिळून खुलेआम प्लास्टिक वापर करण्याची जणू परवानगीच दिली असल्याची चर्चा सेलु शहरात आहे या चर्चेमुळे प्लास्टिक बंदी चा फज्जा उडाला असेच म्हणावे लागेल पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन महाराष्ट्र प्रदूषण मंडळ यांच्यावतीने प्लास्टिक पिशवी आणि थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान 2018 असे पत्रक सर्व व्यापाऱ्यांना वाटून यामध्ये प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचे आव्हान करून सुद्धा एकाही व्यापाऱ्याच्या दुकानावर अद्याप प्लास्टिक बंदी झाली नसून ती बंदी पालिका बैठकीपासून खुलेआम असल्याचे लक्षात येत आहे





अंदाजे एक कोटी रुपयाची प्लास्टिक व पिशव्या व्यापाऱ्यांच्या दुकानात पडून

शहरातील व्यापारीची प्लास्टिक पिशवी व जूट बॅग प्रत्येक व्यापाऱ्याकडे जवळपास एक वर्ष पुरेल एवढी प्लास्टिक पिशवी व जूट बॅग पडून असल्याची चर्चा शेलू शहरांमध्ये आहे प्लास्टिक बंदी मुळे प्रत्येक व्यापाऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे या नुकसानामुळे व्यापार्यांची तर डोकेदुखी झालीच पण ग्राहकांसोबत होणारा वाद वाढत चालला आहे प्लास्टिक पिशवी बंदी जर कडक झाली तर ग्राहका सोबत वाद होणार नाही पण नगरपालिकेच्या पळपुट्या धोरणामुळे धड व्यापाऱ्याला प्लास्टिक पिशव्या देणे किंवा ग्राहका सोबत वाद घालने ही डोकेदुखी ठरली आहे यामुळे व्यापारी नाहक परेशान होत आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें