'असा' आला मोबाईलमध्ये आधार हेल्पलाइन नंबर; गुगलचा माफीनामा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 अगस्त 2018

'असा' आला मोबाईलमध्ये आधार हेल्पलाइन नंबर; गुगलचा माफीनामा.


देशभरातील लाखो स्मार्टफोन धारकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये (फोनबुक) शुक्रवारी (3 ऑगस्ट)आधारचा हेल्पलाइन क्रमांक 18003001947  UIDAI या नावानं आपोआप सेव्ह झाला होता. यामुळे अनेकांना धक्का बसला. आपण स्वतःहून सेव्ह न करताही हा नंबर कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये आलाच कसा? या प्रश्नानं अनेकांना भंडावून सोडलं होतं.  मात्र, या प्रकरणात गुगलची चूक असल्याची माहिती समोर आली आहे. खुद्दगुगलनंया प्रकरणी आपली चूक मान्य करत जाहीर माफी मागितली आहे. तसंच कोणताही सायबर हल्ला झाला नसल्याचंही स्पष्ट केले आहे.
गुगलचा माफीनामा -लाखो स्मार्टफोन धारकांना आमच्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला याचा आम्हाला खेद आहे. झालेल्या चुकीबाबत आम्ही माफी मागतो. UIDAI आणि अन्य 112 हेल्पलाईन क्रमांक अॅन्ड्रॉईडच्या सेटअपमध्ये 2014 साली कोड करण्यात आले होते, अशी माहिती इंटरनल सर्व्हेत समोर आली आहे. हा क्रमांक एकदा ग्राहकांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये सेव्ह झाला की डिव्हाईस बदलल्या नंतरही हाच क्रमांक पुन्हा नव्या डिव्हाईस मध्ये सेव्ह होतो. मात्र, तुमचा मोबाईल हॅक झालेला नाही. कोणताही सायबर हल्ला झालेला नाही.  UIDAIचा आपोआप सेव्ह झालेला क्रमांक तुम्ही डिलीट करू शकता.  नवीन अॅन्ड्रॉईड सेटअप मध्ये हा क्रमांक आपोआप सेव्ह होऊ नये, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें