सोनपेठ येथे विद्यार्थ्यांना टूल किट चे वाटप. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 अगस्त 2018

सोनपेठ येथे विद्यार्थ्यांना टूल किट चे वाटप.



सोनपेठ (राजेश खेडकर) दि.२८ऑगस्ट २०१८

येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील फिटर व इलेक्ट्रिशन या व्यवसायाच्य अनुसूचित जाती प्रवर्गातील प्रशिक्षणार्थ्यांना विशेष घटक योजनेअंतर्गत टूल किटचे वाटप करण्यात आले. संस्थेतील फिटर व इलेक्ट्रिशीयन या व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी प्रशिक्षण चालू आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य धानोरकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार जीवराज डापकर, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट, सुधीर बिंदू, क्षीरसागर हे उपस्थित होते. यावेळी रवी ताटे, निखिल भोकरी, महादेव बचाटे, कारभारी लांडगे, पंकज गायकवाड, विशाल गायकवाड, सुमन आवळे, अश्विनी आढागळे, शुभम रोडे, विनायक चव्हाण आदी विद्यार्थ्यांना उपस्थितांच्या हस्ते टूल किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना तहसीलदार जीवराज डापकर यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस तहसील कार्यालयामार्फत जमीन उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती दिली. उपस्थित प्रशिक्षणार्थींना शुभेच्छाही डापकर यांनी यावेळी दिल्या. पोनि. सोपान शिरसाठ यांनी आपल्या मार्गदर्शनात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी हे यंत्रांचे डॉक्टर असून ते बंद पडलेले यंत्र, उद्योग नीट करतात. कौशल्य प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थीच देश घडवू शकतात असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले तर सुधीर बिंदू यांनी आपल्या भाषणात प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी डॉ. रत्नाकर गुट्टे यांचा आदर्श घेऊन देशासाठी उद्योग उभे करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे विद्यार्थी व विद्यार्थिनींंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन एन. बी. पानसे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षण संस्थेच्या लाखे, लवारी, शेख,  सावळे व आफ्रोज यांनी परिश्रम घेतले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें