सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२८ऑगस्ट २०१८
सक्षम च्यावतीने सोनपेठ येथे लवकरच सक्षम आधार केंद्र सुरु करणार असल्याची माहिती सक्षम चे महाराष्ट्र संघटन मंत्री चंद्रशेखर सिंग यांनी सोनपेठ येथे दिली .
सक्षम या अपंगांसाठी काम करणाऱ्या राष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्र संघटन मंत्री चंद्रशेखर सिंग यांनी दि.२५ ऑगस्ट रोजी शहरातील सक्षम कार्यालयास भेट दिली. संस्थेच्या वतीने सोनपेठ तालुक्यातील अपंग मुला मुलींसाठी घेण्यात येणाऱ्या आरोग्य तपासणी शिबिराबाबतही यावेळी त्यांनी माहिती घेतली, सोनपेठ व परिसरातील बाराशेहून अधिक अपंग मुला मुलींना सोनपेठ येथील सक्षम केंद्रामार्फत मदत करण्यात येते. या मुलांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र, आरोग्य तपासणी , विमा सुविधा, कौशल्य प्रशिक्षण आदी बाबी देण्यात येतात. सोनपेठ येथील केंद्राचे काम पाहून त्यांनी कौतुक केले. अपंग व्यक्तींंच्या कल्याणासाठी सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली. सोनपेठ येथे सक्षम च्यावतीने आधार केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली . या केंद्रा मार्फत परीसरातील अपंग व्यक्तींना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील असे त्यांनी यावेळी सांगितले. २८ ते ३० सप्टेंबर रोजी जयपुर राजस्थान येथे होणाऱ्या सक्षमच्या राष्ट्रीय अधिवेशनात उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी सोनपेठ येथील सुधीर बिंदू, अनिकेत कुरुंदकर, शरद केंद्रे, विजय महाजन, शिंदे, अमोल पांडे, भगवान देशमुख, राकेश मेहता, मोहन खोडवे, महेश देशमुख, राजेश फले आदी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें