सिल्लोड व सोयगाव दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या या मागणीसाठी . - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

मंगलवार, 28 अगस्त 2018

सिल्लोड व सोयगाव दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्या या मागणीसाठी .


सिल्लोडला काँग्रेसचे आजपासून आमरण उपोषण.


सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२८ ) - सिल्लोड - सोयगाव तालुके दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना संपूर्ण वर्षाची नुकसान भरपाई द्यावी आदी मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.१३ ऑगस्ट पासून सिल्लोड तहसिल कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला शासनाने गांभीर्याने न घेतल्याने पक्षाने अखेर साखळी उपोषणाचे रूपांतर आमरण उपोषणात करण्याचा निर्णय घेतला असून उद्या बुधवार दि.२९ ऑगस्ट २०१८ पासून सिल्लोड तहसिल कार्यालया समोर आमरण उपोषणात करण्यात येणार आहे.

काँग्रेस पक्षाच्या वतीने उप विभागीय अधिकारी व नायब तहसिलदार संजय सोनवणे यांना दिलेल्या न निवेदनात म्हणटले आहे. सिल्लोड-सोयगाव तालुके दुष्काळी दुष्काळी जाहीर करा व शेतकऱ्यांना एका वर्षाच्या शेती हंगामाची संपूर्ण नुकसान भरपाई द्यावी या प्रमुख मागण्यांसह ईतर मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात १३ ऑगस्ट २०१८ पासून सिल्लोड तहसिल कार्यालया समोर साखळी उपोषण सुरू आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या साखळी उपोषणात सुरुवातीपासून काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. या उपोषणाच्या दरम्यान सिल्लोड उप विभागीय कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तत्कालीन तहसीलदार संतोष गोरड, उपविभागीय कृषी अधिकारी प्रभोद चव्हाण, तालुका कृषी अधिकारी दीपक गवळी व नायब तहसीलदार संजय सोनवणे आदींनी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषण स्थळी भेट देऊन वरिष्ठांना मागण्यांसह आपल्या भावनांची तीव्रता तसेच सुरू असलेल्या आंदोलनाची कल्पना देण्यात आलेली आहे.करीता उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती.
तालुक्यातील पाऊस पाणी व पिकांची झालेली दयणनिय परिस्थिती व प्रत्यक्षात शेतशिवार मध्ये जाऊन जाणून घेतलेली परिस्थितीचा माहिती शासन दरबारी वरिष्ठांच्या माध्यमामार्फत पाठविण्यात आलेली असल्याचे सांगितले होते. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या शासनाकडून कुठलेच पाऊल उचलले गेलेले नसून शासन उपोषणकर्त्यांचा अंत पाहत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दोन्ही तालुक्यातील शेतकरी व सामान्य जनतेच्या हितासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने अखेर सिल्लोड तहसिल कार्यालय समोर आमरण उपोषण उद्या बुधवार दि.२९ ऑगस्ट २०१८ पासून करण्यात येणार आहे. प्रशासनाने कायदा व सुव्यस्थेच्या दृष्टीने तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी उपोषणकर्त्यांच्या रास्त मागण्यांचा तातडीने सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय घ्यावा ही विनंती. उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार न झाल्यास वरील मागण्यांसाठी उद्या बुधवार दि.२९ ऑगस्ट २०१८ पासून सुरू होणाऱ्या या आमरण उपोषणादरम्यान कुठली अनुचित प्रकार किंवा अनुचित घटना घडल्यास याची सर्वस्व जवाबदारी प्रशासन व शासनावर राहील असा ईशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देतांना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, अमित आरके, सलीम हुसेन, चेअरमन राजेंद्र बन्सोड, अकिल देशमुख, तुळशीराम डफळ, मतीन देशमुख, रविंद्र आरके, सुभाष जाधव,दामोधर अन्वीकर,यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी - कार्यकर्ते नागरिकांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें