सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२७ऑगस्ट २०१८
वृक्षारोपान व संवर्धन सामजिक चळवळ सोनपेठ व नैसर्गीक पर्यावरण संवर्धन-भारत यांच्या वतीने
मानवता विकासचे जिल्हाध्यक्ष तथा वृक्षमित्र महेश जाधव यांच्या कै.बाजीराव देशमुख विद्यालय, शेळगाव (म.) येथील मोफत रोपवाटिकेतील २५१ वृक्षांचे वृक्षारोपण करून वृक्ष पर्यावरण व सजीव संरक्षणाचा सामाजिक संदेश देऊन परभणी जिल्ह्यातील पहिले ठरावे असे मानवनिर्मित वन निर्मितीस सोनपेठ व डिघोळ येथील तरुणांनी एकत्र येऊन आज प्रारंभ केला.
याकार्यक्रमास नैसर्गिक संवर्धन व मानवता विकास जिल्हाध्यक्ष वृक्षमित्र महेश जाधव यांनी रेणुकादेवी डोंगरभागात मोठ्याप्रमाणात वृक्षारोपन करून या प्रसिद्ध देवस्थानचे नैसर्गिक सौदर्य वाढवून रेणुका देवीस हिरवा शालू अर्पण करू. त्यासाठी सर्व तरुणांनी एकत्र येऊन हे कार्य पूर्ण करण्याचे आवाहन केले. पर्या.सं. व मा. विकासचे सोनपेठ ता.अध्यक्ष विजय राजभोज, सोनपेठ ता.उपाध्यक्ष सुशील सोनवणे, प्रा.पंडित राठोड, सोनपेठ सचिव उमेश सोळंके, सावली फाऊंडेशनचे सचिव अजयजी देशमुख, उपाध्यक्ष अक्षयजी देशमुख, सरपंच गोकुळ आरबाड, उदय ग्रिन इंडिया क्लबचे अध्यक्ष डॉ.दिपक काळे, सचिन सिरसाट, श्याम बोकरे, विजय तुपसमुन्द्रे, विशाल मस्के, रईस कुरेशी, अमृत आरसुडे, चंद्रशेखर किरवले, गणेश अन्नपूर्णे, सुनील देशमुख, विलास पांचाळ, दीपक गायकवाड, अनिल जगताप, लखन रसाळ, मोसिन शेख, अमोल पवार, भागवत शिंगाडे आदींची डिघोळ येथील तरुण या प्रसंगी उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें