उर्दू शाळेची भिंत कोसळून सात विद्यार्थी जखमी.मुख्याध्यापकाची पालकासोबत अरेरावी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 अगस्त 2018

उर्दू शाळेची भिंत कोसळून सात विद्यार्थी जखमी.मुख्याध्यापकाची पालकासोबत अरेरावी.



चौकशी करून मान्यता रद्द करण्याची पालकांची मागणी.


जिंतूर / निशाद आहेमद
शहरातील उस्मानपुरा भागातील उर्दू प्राथमीक विद्यालयाची भिंत कोसळून सात विद्यार्थी जखमी झाल्याची घटना 27 ऑगस्ट रोजी 2 वाजेच्या सुमारास घडली जखमी विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत मात्र जाब विचारणाऱ्या पालकांसोबत मुख्याध्यापकानी हुज्जत घालून अरेरावीची भाषा वापरली दरम्यान पावसामुळे भिंत कोसळली यातून तालुक्यात शैक्षणीक संकुलनाची परिस्थिती काय आहे यांच्यावरून दिसून येत आहे. परिणामी पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान मोठी दुर्घटना टळली असल्याने महाविद्यालयाची चौकशी करून मान्यता रद्द करण्याची मागणी पालकांनी केली आहे..
याबाबत अधिक माहिती अशी शहरातील उस्मानपुरा भागातील धोबी गल्लीत मागील 8 वर्षांपासून अबूबकर सिद्दीकी उर्दू प्राथमिक विद्यालयात 1 ते 7 वर्ग असून विद्यालयात 340 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत मात्र महाविद्यालयात स्थापनेपासून दिवसांपासून पडक्या व जीर्ण झालेल्या इमारती मध्ये एकाच बाजूने भिंत असून दुसऱ्या बाजूने पत्रे लावून ही शाळा चालवली जात आहे आज दुपारी 2 वाजेच्या सुमारास चौथीच्या वर्गात शिकवणीचे काम चालू असताना अचानक भिंत कोसळत असताना आवाज ऐकून विद्यार्थी घाबरून पळापळ सुरू झाली याच दरम्यान वर्गातील फातेमाबी शेख अझर,सोमय्या फैजूला खान,खिजरा तलेफ चाऊस,सानिया रहीम शेख,सय्यद अनसीरा मोहसीन,उजमा खान बखत्यार खान या विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर प्राथमीक उपचार करण्यात आले परंतु मुख्याध्यापकाचा दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप करत जाब विचारणाऱ्या पालकांवरच अरेरावीची भाषा वापरून अपमानीत केले असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या शिक्षण अधिकारी व विद्यालयाचा मुख्याध्यापकाची चौकशी करण्याची मागणी पालक करत आहेत
एकंदरीत तालुक्यात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जीर्ण झालेल्या भिंत कोसळून दुर्घटना घडल्यामुळे तालुक्यातील सैक्षणिक संकुलनाची काय अवस्था असून प्रशासन व शालेय व्यवस्थापन किती दक्ष आहे  यावरून दिसून येत आहे..
राज्य शासनाचा वतीने अल्पसंख्यांक शाळेना भौतिक सुविधा अंतर्गत अंदाजे तीन ते चार वर्षांपासून प्रतीवर्षी दोन लाख रुपयाचे अनुदान प्राप्त होऊनही हा निधी शाळेचा संचालक मंडळाने भौतिक सुविधेवरचा खर्च केवळ कागदी घोडे नाचून हडप करण्यात आला आहे असल्याचे पालक सांगत आहेत

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें