बारा बालुतेदारांना ९% आरक्षणाची मागणी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

सोमवार, 27 अगस्त 2018

बारा बालुतेदारांना ९% आरक्षणाची मागणी.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२७ऑगस्ट २०१८
 बारा बलुतेदार समाजाला स्वतंत्र ९% आरक्षण मिळावे या मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले.
       महाराट्रातील बारा बलुतेदारांंची अवस्था अत्यंत बिकट होत चाललेली आहे. जागतिकीकरणामुळे बलुतेदारांचे व्यवसाय कालबाह्य होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.  माजी न्या. ईर्श्वया आयोगाने २७% आरक्षणाचे विभाजन करून बारा बलुतेदारांना स्वतंत्र ९% आरक्षण देण्याची शिफारस मा. पंतप्रधानाकडे केलेली आहे; ती त्वरीत लागु करण्याची मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी आरक्षणाच्या मागणीचे निवेदन नायाब तहसिलदार निकेतन वाळे यांच्याकडे देण्यात आले. निवेदनावर ज्ञानोबा वाघमारे, कारभारी दळवे, अशोक सुरवसे, ज्ञानेश्वर दळवे, नरहरी सुरवसे, नामदेव राऊत, अंकुश पारवे, विष्णू मस्के, भगवान राऊत, किरण मस्के आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें