भोकरदन प्रतिनिधी :(सलिम शेख)भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कुल मध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
भावा-बहिणीच्या नातेसंबंधाला जपणारा, त्यांचे नाते दृढ करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिकरीत्या राखीची प्रतिकृती साकारली होती.
आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहतात. प्रत्येक धर्माचे सण एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. बालमन हे संस्कारक्षम असतं. त्याच काळात जर आपण त्यांना सणांचं महत्व सांगून ते साजरे कसे केले जातात हे दाखवलं तर आपली पुढची पिढी आपल्या संस्कृतीचे जतन करण्यासाठी सक्षम होईल. हाच उद्देश समोर ठेऊन आम्ही असे विविध सण-उत्सव साजरे करत असल्याचे संस्थेचे सचिव विलास काळे यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बालासाहेब करतारे, शाळेचे मुख्याध्यापक नितीन ठोंबरे, व्यवस्थापक गणेश सोळुंके, सहशिक्षिका दया पवार, तृप्ती अग्रवाल, श्रीमती सोनाली ठोंबरे, श्रीमती टी.एस.आडे, सरिता काळे, सुवर्णा सोळुंके, सविता जाधव, विलास ढवळे, विष्णू खिल्लारे, अकिल शेख, विष्णू शेवाळे, ऋषिकेश काळे, अंकुश सोलाट यांच्यासह पालकांची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें