जनहितार्थ योजना लाभार्थींपर्यंत पोचवण्यासाठी नगरपरिषद तत्पर - आ. अब्दुल सत्तार.
सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२५) - सिल्लोड शहरातील आर्थिक कमकुवत व दीनदुबळ्या कुटुंबियांना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ मिळावा या दृष्टीने नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील असते, त्याचाच परिपाक म्हणून प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना योजनेची परिपूर्ण माहिती व्हावी याकरिता मार्गदर्शन शिबिराचे शनिवार (दि 25)रोजी आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी माजी मंत्री आ. अब्दुल सत्तार म्हणाले सामान्य गोरगरीब व आर्थिक कमकुवत कुटुंबीयांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी अशा कार्यात सदैव आपले योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
सिल्लोड नगरी परिषदेच्या वतीने जि प प्रशाला मैदानावर प्रधानमंत्री स्वास्थ आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशवराव पाटील तायडे होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुभाष झांबड, औरंगाबाद शहर काँग्रेस अध्यक्ष माजी आ. नामदेवराव पवार, कार्याध्यक्ष माजी आ. डॉ. कल्याणराव काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाताई पवार, जिल्हा दूध संघाच्या संचालक कुशीवर्ताताई बडक, आदींची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. उपस्थित पाहुण्यांचे नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह नगरसेवकांनी सत्कार केला.
उदघाटनाच्या भाषणात आ. अब्दुल सत्तार म्हणाले केंद्र व राज्य शासनाच्या जनकल्याण योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं व योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम आपलं कर्तव्य म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. सिल्लोड नगर परिषद सातत्याने जनकल्याण योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असते, नगरपरिषदेची हीच तत्परता लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यास कारणीभूत आहे. शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांनी आपल्या कुटुंबीयांची यथोचित माहिती मुदतीत देण्याचे काम करावे एकही लाभार्थी लाभापासून वंचीत राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन आ.अब्दुल सत्तार यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून केशवराव तायडे यांनी नगरपरिषदेची कार्यपध्दती व नागरिकांसोबत असलेले योग्य समन्वय या बळावरच शहरात शासनाच्या योजनांची योग्य प्रकारे व प्रभावीपणे अंमलबावणी होते असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला आ. सुभाष झांबड, माजी आ. नामदेवराव पवार, बाजार समिती सभापती रामदास पालोदकर, नगराध्यक्ष अब्दुल समीर, काँग्रेस तालुकाध्यक्ष देविदास लोखंडे, महिला काँग्रेसच्या दुर्गाताई पवार, बँकेचे संचालक कौतिकराव बडक, शिवसेनेचे गटनेते सुदर्शन अग्रवाल आदींनी आपल्या भाषणातून सिल्लोड शहरात नगर परिषदेने राबवलेल्या विविध विकास योजना व जनकल्याणाच्या योजना कशा प्रकारे प्रभावीपणे राबवल्या जातात व या योजनांचा लाभ सामान्य लाभार्थीना मिळवून दिला जातो ही बाब गौरवास्पद आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी अशोक कायंदे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रकल्प विकास अधिकारी देवेंद्र सूर्यवंशी यांनी तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे यांनी केले.
या कार्यक्रमाला उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड , काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा.मन्सूर कादरी, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, संजय आरके, नगरसेवक शांतीलाल अग्रवाल, मोहमहद इसहाक, ताई निकम, रऊफ बागवान, शेख मोहसीन, रईस मुजावर पठाण, राजेंद्र गौर, सुपडू कुरेशी, कैसर आझाद, राजरत्न निकम, सत्तार हुसैन, लड्डू पटेल, सुनील दुधे, शेख बाबर, मिर्झा सांडूबेग, राजु दुधे, राजु बागवान, पंचायत समिती सदस्य निजाम पठाण, पांडुरंग गवळी, अलि चाऊस, मधुकरराव गवळी, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सतिश ताठे, अब्दुल रहिम , मनोज झंवर, पंजाबराव चव्हाण, अनिस पठाण, मतीन देशमुख, मोबिन पठाण,मियाभाई, राजेंद्र बन्सोड, हाजी मोहम्मद हनिफ, मधुकरराव बेंडाळे, संजय मुरकुटे, मनोज कोठाळे, लक्ष्मण कल्याणकर, मुश्ताक बापु देशमुख, दिलीप गवळी, दशरथ सुरडकर, रोहिदास पवार, सुखदेव जिवरग, गणेश डकले, अब्दुल बासित, कुणाल सहारे, लड्डू पटेल, अकिल देशमुख, राजेश्वर आरके , अमित आरके, राजु साठे, मनोहर आरके, सुभाष जाधव, एकनाथ शिंदे, जितू आरके, भावराव दुधे, सखाराम अहिरे,रवि आरके, जगन्नाथ कुदळ,अमोल कुदळ, फईम पठाण,तौसिफ पठाण आदींसह या कार्यक्रमाला नागरिकांची मोठ्यासंख्ये उपस्थिती होती. महिलांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. महिलांची उपस्थिती तर नोंद घेण्यासारखी व उल्लेखनीय अशी होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें