तुळशीची माळ व आष्टगंध हि अलंकारीक भक्ती संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 25 अगस्त 2018

तुळशीची माळ व आष्टगंध हि अलंकारीक भक्ती संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नाही.



ह.भ.प.अंबादास पावडे महाराज यांचे विवेचन.


 केशवराव बाबासाहेब मंदीरात श्रावणमासी ज्ञानेश्वरी प्रवचन सत्संग.


सेलू प्रतिनिधी (समशेर  खान)


          आई - वडील यांना वृध्दाश्रमात ठेवून गळ्यात तुळशीची माळ व डोक्याला आष्टगंध लावून देवाची वारी करणारा अलंकारीक भक्त संत ज्ञानेश्वरांना अभिप्रेत नसुन या दिखाऊ भक्तां पेक्षा आंतकरणातुन ईश्वरभक्ती करणार्या  भक्ताला संत ज्ञानेश्वर माऊली श्रेष्ठ मानतात असे विवेचन ह.भ.प.अंबादास महाराज यांनी केले.
           सेलू शहराचे ग्रामदैवत केशवराव बाबासाहेब मंदीरात श्रावण महिन्यात १२ आँगष्ट पासुन ज्ञानेश्वरी प्रवचन सत्संग चालू आहे .येथे दरदिवशी महाराष्ट्रातून  वेगवेगळी संत ,महंत मंडळी  हे ज्ञानेश्वरी वर रात्री ८ ते ९ या वेळेत अभ्यासपूर्ण प्रवचन  करतात.२४ आँगष्ट रोजी १३ व्या दिवशी ह.भ.प.अंबादास महाराज पावडे हे ज्ञानेश्वरी ग्रंथातील ओवीवर प्रवचन करतांना बोलत होते.
                 भक्त आणि ईश्वर हि परंपरा हजारो वर्षापासून जिवंत राहिली असुन वारकरी सांप्रदायाने ती जपुन ठेवत समाजाच्या तळागाळापर्यंत नेली हे सर्व ज्ञात आहे.संत गोरोबाकाका ,भक्त पुंडलीक यांच्या भक्ती चे सविस्तर वर्णन करीत पावडे महाराज यांनी श्रोत्यांसमोर खर्या भक्ती चा मांडलेला महिमा श्रोत्यांना आंतर्मुख करून गेला  . टेंपररी भक्तांपेक्षा जिज्ञासू भक्तांसाठी संताच आंतकरण दयाळू आसतं.अमुल्य आसा मानवी नरदेह मिळालेल्या सर्वांनी आंतकरणातुन भक्ती केली पाहिजे .जसे पाणी हे पोहणार्यांच्या लाथा खातं.पण न पोहणार्यांना बुडविल्या शिवाय राहत नाही.तसे भक्तांना आश्रय देऊन दुष्टांचा नाश करणे हे विधान सत्य आसल्याचे त्यांनी विवेचनात सांगितले.एक तासाच्या विवेचनात पावडे महाराज यांनी संसारीक दाखले देत मुक्ती साठी एकच असा भक्ती मार्ग असल्याचे सांगितले .सत्संगा पुर्वी ७:३० ते ७:५५ या वेळेत नामजप घेण्यात आला .प्रसादाची सेवा प्रदिप नाईक यांनी केली तर संजय पिंपळगांवकर यांनी प्रस्तावना व पसायदान घेतले.


*अंध ह.भ.प.अंबादास महाराज यांची प्रचंड ईच्छाशक्तीची भक्ती.*
             ह.भ.प.अंबादास महाराज हे अंध आहेत .त्यांना काहिही दिसत नाही त्यांनी केवळ प्रचंड ईच्छाशक्तीच्या बळावर भक्ती करत या श्रवणातून त्यांनी भक्तीज्ञान आत्मसात केले.त्यांनी ज्ञानेश्वरी वर केलेले विवेचन हे अत्यंत मौलीक होते.ते उत्कृष्ट मृदंगवादक आहेत.त्यांनी बरोबर ९ वा.ज्ञानेश्वरी विवेचनाचा समारोप केला हे डोळस श्रोत्यांसाठी कुतूहलच ठरले.
चौदा वर्षाचा अखंड उपक्रम. ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर समिती ,जिर्णोध्दार समिती व ज्ञानेश्वरी आराधना मंडळ यांच्या संयुक्त परीश्रमातून श्रावणातील ज्ञानेश्वरी प्रवचन सत्संग ला १३ वर्षे पुर्ण होऊन १४ व्या वर्षी अखंडपणे हि सेवा चालू आहे .आत्तापर्यंत महाराष्ट्रातील १५० उत्तम प्रवचकारांनी येथे सेवा दिली आहे.या प्रवचनासाठी भाविकभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें