सेलु प्रतिनिधी.शमशेर खान.
सेलूत काही महिन्या पासून मराठा समाजाचा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनास राज बेलदार बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेचा जाहीर पाठींबा देत आहोत . मराठा समाजाचा विविध मागण्या तसेच ओ . बी . सी . आरक्षणाची मागणी ही न्याय असून मराठा समाजाची ओ . बी . सी . आरक्षणाच्या माध्यमातून प्रगती होवू शकेल अशी आम्हास आशा आहे . या आरक्षणाच्या मागणीसाठी समाजातील काही तरुण मुल मुलींनी बलिदानाची शासनाने गांभीर्यपुर्वक दखल घेवून मराठा समाजाच्या दिलेल्या उन्नतीसाठी त्यांना तात्काळ आरक्षण देण्यात यावे . तसेच मराठा समाजा बरोबरच मुस्लिम , धनगर या समाजाच्या प्रगतीसाठी देखील शासनाने तात्काळ पाऊले उचलून आरक्षणा बाबत तात्काळ निर्णय घ्यावा . शासनस्तरावरुन मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्र दखल घेवून येत्या 09 ऑगस्ट 2018 पुर्वी मराठा , मुस्लिम , धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावा . अन्यथा समाजात अराजकता वाढण्यास सुरुवात होईल . मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनात आमची राज बेलदार बहुउद्देशिय सेवाभावी संस्था , सेलू ही भाग घेत असून आमचा या आरक्षण आंदोलनास सक्रिय पाठींबा आहे . करिता हे जाहीर पाठींबा बाबतचे निवेदन . अध्यक्ष राज़ बेलदार बहुउद्देशिर्षे सेवाभावी संस्था , सेलू , मो . रफिक मो . सलीम सत्तारखा महमूद खॉ अध्यक्ष सचिव तसेच राज बेलदार बहुउद्देशिय सेवाभावी संस्था , सेलू चे समस्त सदस्यंचे स्वाक्षरया आहेत.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें