सेलू पोलीस ठाण्यात ठेवले तरुणाचे प्रेत ; जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षकांची प्रतिक्षा सुरुच ; खा. जाधव यांनी दिली पोलीस ठाण्यास भेट, जमावाचे ऐकले गार्हाने.
प्रतिनिधी /शमशेर खान/५ ऑगस्ट
सेलू : तालुक्यातील डिग्रसवाडी एका पदवीधर तरुणाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या स्वत:च्या फेसबुक खात्यावरुन मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याची खंत व्यक्त आपण जातीसाठी बलीदान देत असल्याची संदेश पाठवुन स्वत:ला रॉकेल टाकुन पेटवुन घेतले. या तरुणाचे रविवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वा. जागीच निधन झाले.
आरक्षणाच्या मागणीसाठी आपल्या सहकारी बांधवाने पेटवुन घेऊन आत्महत्या केली आणि त्याचा संदेश आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन मुख्यमंत्र्यांना टाकली. म्हणुन जमावाने प्रेत सेलू पोलीस ठाण्यात दुपारी १ वाजल्यापासुन आणुन ठेवले आहे. सुमारे तीन तासापासुन जमाव आपल्या मागणीवर आडुन आहे. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक येणार म्हणुन त्यांची प्रतिक्षा ही सुरु आहे. शिवसेनेचे खा. संजय जाधव यांनी पोलीस ठाण्यात भेट देऊन जमावाचे म्हणने ऐकुन घेतले. या बाबतची माहिती या प्रमाणे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सेलू तालुक्यातील डिग्रसवाडी येथील आनंता सुंदरराव लेवडे वय २२ या तरुणाने रविवार ५ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजास आरक्षण मिळत नसल्याने स्वत:च्या फेसबुक अकाऊंटवरुन संदेश पाठविल्यानंतर स्वत: अंगावर रॉकेल ओतुन पेटवुन घेतले. या आगीच्या भडक्यात त्याचे जागीच निधन झाले. या निधनाची बातमी सेलु शहरात कळताच तरुणांचा मोठा लोंढा डिग्रसवाडी येथे दाखल झाला. पोलीस ही घटनास्थळी धावले. घटनेचा पंचनामा करुन प्रेत सेलुला आणण्यात आले. परंतु प्रेत उपजिल्हा रुग्णालयात शव विच्छेदनासाठी नेण्याएवजी जमावाने सेलू पोलीस ठाण्यात आणले. दुपारी १ वाजल्यापासुन पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला असुन जमावाने मुख्यमंत्र्यावर खूनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रमुख मागणी केली आहे. तसेच शासनाने मयताच्या कुटूंबाला ५० लाख रुपये द्यावेत आणि कुटूंबातील एका व्यक्तीस शासकिय नोकरी द्यावी अशा मागण्या जमावाकडुन करण्यात आल्या. दुपारी १ वाजल्या पासुन मयत आनंता लेवडे यांचे प्रेत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलेले आहे.
सेलू बंद घबराट आणि शांतता : घटनेची माहिती कळताच आणि प्रेत अद्यापही ठाण्यात असल्याने काही तरुणांनी मोंढ्यातील दुकाने बंद केली. तर शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात टायर जाळण्यात आले. या घटनेमुळे लोकांनी भितीपोटी आपले दुकाने बंद केले. लोकांच्या मनात उदे्रकाची भिती असल्यामुळे घबराहट निर्माण झाली असली तरी पण शहरात पोलीस बंदोबस्त असुन शांतता आहे.
ठाण्यातच करणार अंत्यसंस्कार : मयत आनंता लेवडे यांच्या निधना नंतर जमावाच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर आनंता लेवडे यांच्यावर सेलू पोलीस ठाण्यातच अंत्यसंस्कार करण्याचा पवित्रा जमावाकडुन घेण्यात येत असल्याचे घटनास्थळी अशी परिस्थिती आहे.
उपजिल्हाधिकारी पुनर्वसन जिल्हाधिकारी कार्यालय परभणी विश्वंभर गावंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र 5 मार्च 2018 रोजी सुंदर लेवडे यांना दिले या पत्रामध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून दहा लाखांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच मयताच्या कुटुंबातील एका सदस्यास शैक्षणिक पात्रतेनुसार प्राधान्यक्रमाने नोकरीत घेण्याची कार्यवाही करण्यात येईल किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये त्याचे कुटुंबातील सदस्यास नोकरीत समावेश करून घेण्यात येत असल्यास त्याचे मंजुरी बाबत कार्यवाही करण्यात येईल करिता सकल मराठा समाज यांना विनंती करण्यात येते की आपले आंदोलन मागे घेण्यात यावे याबाबत जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन सकारात्मक आहे अशा आशयाचे पत्र यावेळी त्याचे वडील सुंदर लेवडे यांना देण्यात आले या येळी परभणीचे खासदार संजय जाधव यांनी पाच लाखांची मदत तसेच सेलू जिंतूर चे आमदार विजय भांबळे यांनी दोन लाखांची मदत यावेळी जाहीर केली.


कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें