सेलू (समशेर पठाण )
मनुष्य गण हा प्रारब्धा बद्दल नेहमीच चिंता करत आसतो .परंतु जिवनप्रक्रीयेची गती हि मन आणि बुद्धी वर आवलंबुन आसते व यासाठी सत्कर्म आवश्यक आसते म्हणुन सत्कर्मा मध्ये प्रारब्ध बदलण्याची खरी ताकद आहे असे विवेचन श्री. ह.भ.प.शंतनू शिवाजी पाठक महाराज यांनी केले .
ग्रामदैवत केशवराव बाबासाहेब मंदिरात आयोजीत ज्ञानेश्वरी प्रवचनाचे १४ वे पुष २५ आँगष्ट रोजी ह.भ.प.शंतनु पाठक महाराज यांनी गुंफले त्यावेळी ते विवेचन करीत होते.ते म्हणाले की,जिवनपुर्णपणे समजावे म्हणुन संत ज्ञानेश्वरांनी पवित्र असा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहला.त्यामुळे एक तरी ओवी अनुभवावी असे सांगत यामधून साधक आणि साधू हे नाते निर्मान होते.साधक व साधू यांच संमिश्रण म्हणजे आध्यात्म आहे आसे त्यांनी सांगितले. युवकपिढीनी या आध्यात्मिक संस्कृतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे.इंद्रिये ताब्यात ठेवणारा खरा ज्ञानी आहे अशी व्याख्या संत ज्ञानेश्वर महाराज यांनी केली आहे .बि.एस.सी .मध्ये शिक्षण घेत असलेल्या शंतनु पाठक महाराज यांनी एक तासात ज्ञानेश्वरी मधील ओवीवर सुंदर असे विवेचन केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें