कन्नड प्रतिनिधि:-शेख शहेबाज।
कन्नड (दि:-७ अगस्ट) चिचोंली (लिंबाजी) परीसरातील सर्वात मोठी बँक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा चिचोंली (लिंबाजी) गेल्या अनेक दिवसापासुन शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे बंद आहे बाजार पेठेच्या दुष्टीने सर्वात मोठा गांव असलेला चिंचोली (लिंबाजी) येते अनेक दिवसापासुन बंद असलेल्या बँक आॅफ महाराष्ट्रा मुळे शेतकरी वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे।
सध्याच्या परीस्थिती मध्ये बँक बंद असल्यामुळे बोंड अळी सरख्या अनेक शासकीय योजनेचा शेतकरी वर्गाला लाभ देखील घेता येत नाही आहे शेतक-यांसह सर्व सामान्य जनतेने बँके मध्ये जमा केलेले पैसे सुध्दा शाखा व्यवस्थापक नसल्यामुळे काढता येत नाही आहे।
शाखा व्यवस्थापक रूजा करा असा निवेदन मा.तहसीलदार महेश सुधळकर यांना देण्यात आला यावेळी उपस्थित कन्नड नगरपरिषदचे माजी नगरअध्यक्ष श्री संतोष कोल्हे, प्रा समाधान गायकवाड आदिंसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते।

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें