महाराष्ट्र बंद; कुठं काय? - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

महाराष्ट्र बंद; कुठं काय?



▪ मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून सकल मराठा समाजाकडून राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनाला सुरुवात...

▪ दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पंढरपूर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे (शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड आणि भोर), औरंगाबादमध्येही काही मोबाइल कंपन्यांची इंटरनेट सेवा बंद...

▪ नाशिक, ठाणे आणि नवी मुंबई या तीन शहरांत बंद पाळला जाणार नसून सुरक्षेच्या कारणास्तव ठाणे-नवी मुंबईतील शाळा मात्र बंद ठेवल्या जाणार...

▪ अहमदनगर - एसटी बससेवा बंद असून शहरातील बसस्थानकावर शुकशुकाट, शहरातील बहुतांश महाविद्यालय बंद...

▪ औरंगाबाद - जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; रस्त्यावर कोणतीच वाहतूक नाही; रिक्षा पूर्णपणे बंद...

▪ पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बंदचा परिणाम, लोणावळा शहरात व्यवहार ठप्प, जुना पुणे- मुंबई महामार्ग ही रिकामा...

▪ सोलापूर - सोलापुरात सकाळपासून संमिश्र बंद, जिल्ह्यातील 133 मार्गावर आज मराठा समाजाकडून ठिय्या आंदोलन होणार...

▪ लातूर - जिल्ह्यात कडकडीत बंद, सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी,एसटी बस जागीच उभ्या, बाजारपेठ बंद, पोलिसांचा तगडा बंदोबस्त, लातूरमधून बाहेरगावी जाणारी-येणारी रस्ते वाहतूक बंद...

▪ रायगड - बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद, महाड, अलिबाग, खोपोली, खालापूर येथे बाजारपेठ बंद...

▪ भोसरी MIDC बंद, MIDC परिसरात साडे तीन हजार, तसेच कुदळवाडी, तळवडे आणि शहरात अशा एकूण आठ हजार कंपन्यांवर परिणाम,,,

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें