मानवत / मुस्तखीम बेलदार
दि.०१: मानवत येथील शासकिय विश्रामगृहात भारिप बहुजनमहासंघाची तालुका कार्यकारणीची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तसेच आज दि.१ आँगस्ट अण्णाभाऊ साठे यांच्या ९८व्या जयंती निमित्ताने अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पुजन करून तालुका कार्यकारणी ची बैठक भारिप बहुजनमहासंघाचे जिल्हाअध्यक्ष प्रविण कनकुटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यातआली या बैठकीत मानवत शहराच्या कार्यकारणीची निवड करण्यात आली यात भारिप बहुजनमहासंघाच्या शहर अध्यक्षपदी गौतम जमधडे तर शहरसचिव पदी दिपक धबडगे तर कोषाध्यक्ष पदी विजय धबडगे तसेच महिलां तालुका सचिव पदी कुसुमताई कनकुटे यांची नियुक्ती करण्यात आली. भारिप बहुजनमहासंघाचे जिल्हाअध्यक्ष प्रा . प्रविण कनकुटे यांच्या हस्ते नियुक्ती पञक देण्यात आले या बैठकीचे आयोजन भारिप बहुजनमहासंघाचे तालुका अध्यक्ष नंदुभाऊ कुमावत यांनी केले तर या बैठकीत महेंद्र ठेंगे, श्रीरंग पंडित , के.वाय दवडे ,राहुल रणदिवे , वंदनाताई जोधळे तर आंबेकर युवामंच चे विजय खरात ,शुंभम पंचागे ,मेघनंद भाले , लखन धबडगे ,विशाल धबडगे ,रमेश धबडगे अमजत भाई ,नितीन ढाले यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यकारणीची निवड करण्यात आली तसेच नविन कार्यकारणीच्या पदाधिकारीचे यावेळी सत्कार हि करण्यात आले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें