लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी दिन - दलित - गोरगरिबांना घडविण्याचे काम केले - आ.अब्दुल सत्तार ; विश्वसाहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ; - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 2 अगस्त 2018

लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांनी दिन - दलित - गोरगरिबांना घडविण्याचे काम केले - आ.अब्दुल सत्तार ; विश्वसाहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी ;



सिल्लोड : प्रतिनिधी.शे.कलिम.( दि.०१ ) -
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी साहित्यरत्न लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून दिन - दलित - गोरगरिबांना एक अनमोल खजिनाच बहाल केला असल्याचे मत माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी यांनी व्यक्त केले.
सिल्लोड येथे लोकशाहिर आण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी उपस्थित समाजबांधवाना मार्गदर्शन करीत असतांना माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार बोलत होते.
साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.रॅलीचा समारोप सिल्लोड शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे करण्यात आला.विश्व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्तंभ व चौकाच्या नामफलकास तसेच काँग्रेस पक्ष कार्यालय गांधी भवनात अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस माजीमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पुढे बोलतांना आ.अब्दुल सत्तार यांनी शहरासह ग्रामीण भागातील वाडी - वस्ती - तांड्यांवरील मातंग समाजातील अनेक जण आजही शिक्षणापासुन वंचित असुन समाजासाठी झटत - एकत्रित होऊन शिक्षण घेतल्याशिवाय समाजाचा विकास होणार नाही. तसेच लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा अमूल्य खजिना आत्मसात करुन दिन - दलित - गोरगरिबांच्या हितासाठी सदैव झटत राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते व उपस्थितांना केले.
समाजसुधारक ,कादंबरीकार,लेखक,राजकीय कृतीशिलतेचे केंद्रबिंदू,लोककवी, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख प्रवक्ते प्रा.सुरेश चौथाईवाले यांनी लोकशाहिर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रावर सखोल असे मार्गदर्शन करीत मातंग माणुस हा एक इमानदार व वफादार असुन सर्व जाती - धर्मांसोबत वावरणारा समाजबांधव असल्याचे मत व्यक्त केले. उपस्थितांमध्ये समाजकार्यासाठी सदैव झटत राहत परिवर्तनवादी विचार मनात बिंबवण्यावर विचारातून भर दिला.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रामदास पाटील पालोदकर, काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष देविदास पाटील लोखंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती नंदकिशोर सहारे, शांतीलाल अग्रवाल, प्रा.मन्सूर कादरी, दामोदर गव्हाणे, कौतिकराव बडक, महिला जिल्हा उपाध्यक्षा दुर्गाबाई पवार, उपनगराध्यक्षा शकुंतलाबाई बन्सोड, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ, रऊफ बागवान, सलिम हुसैन, राजू गौर, रईस मुजावर पठाण, राजरत्न निकम, शेख बाबर, मनोज झंवर, निजाम पठाण, माणसिंग राजपूत, सुपडू कुरैशी, संजय मुरकुटे, संजय आरके, अमित आरके, मनोहर आरके, राजेश्वर आरके, सुनील लांडगे, लक्ष्मण कल्याणकर, विजय खाजेकर, सुभाष जाधव, जितू आरके, राजू सुरडकर, शेख मोहसिन, अक्षय मगर, एकनाथ शिंदे, फईम पठाण, जगन्नाथ कुदळ, आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजक अशोक कांबळे, सखाराम अहिरे, राजू साठे, शिवदास दणके, विजय अहिरे, कैलास भाले, शिवदास तुपे, मनोज अहिरे, बाबुराव अहिरे, संजय अहिरे, महिन्द्रा अहिरे, रवि पवार आदिंसह पदाधिकारी - नागरिकांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.राम जंजाळ यांनी केले. तर आभारप्रदर्शन सखाराम अहिरे यांनी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें