सेलू प्रतिनिधी
सेलू तालुक्यातील
देवगावफाटा परिसरातील शेतातील
विहिरीमध्ये एका अनोळखी इसमाचा
मृतदेह पाण्यात तरंगत असताना २९
ऑगस्ट रोज़ी आढळून आला.
देवगावफाटा येथील सखाराम
चव्हाण यांनी चारठाणा पोलीस
स्टेशनला दिलेल्या माहितीवरुन २९
ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा अर्जुन
चव्हाण व त्याची पत्नी शीतल
चव्हाण हे दोघे शेतामध्ये मुगाच्या
गंगा तोडणी करीता गेले होते. अर्जुन
चव्हाण हा पाणी आणण्यासाठी
शेतातील विहिरीवर सकाळी १०
वाजता गेला असता, त्याला एका
अनोळखी इसमाचे प्रेत तरंगत
असल्याचे दिसले. याबाबत त्यांनी
चारठाणा पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर पोलिस जमादार गुलाब भिसे
व ज्ञानेश्वर जाणगर यांनी
घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मयत ईसमाची ओळख पटली नाही.
हा मृतदेह उतरीय तपासणीसाठी
सेलू उपजिल्हा रुग्णालयात येथे रात्री
७ वाजता आणण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें