मराठा आरक्षण व इतर मागण्या साठी शहरासह तालूका कडकडीत बंद. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

गुरुवार, 9 अगस्त 2018

मराठा आरक्षण व इतर मागण्या साठी शहरासह तालूका कडकडीत बंद.



सोनपेठ(राजेश खेडकर) दि.०९ऑगस्ट २०१८

मराठा आरक्षण व इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर सोनपेठ येथेही कडकडीत बंद पाळण्यात आला. यामुळे शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने बंद ठेवून या बंदला पाठींबा व्यक्त केला. यामुळे संपूर्ण बाजारपेठ सामसूम दिसली. बंद मुळे बस स्थानकातून सकाळपासून एकही बस आली अथवा गेली नाही. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयही बंद ठेवण्यात आले होते.
तत्पूर्वी सोनपेठ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून संयोजकांच्यावतीने आंदोलन शिस्तबद्ध व शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.
मराठा समाजाच्या प्रलंबित असलेल्या आरक्षण व इतर मागण्यांवर शासनाचे लक्ष वेधन्यासाठी व मागण्या मान्य करून घेन्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रभर विविध आंदोलने करण्यात आली. परंतू मागण्यांवर निर्णय होत नसल्यामुळे आज सकल मराठा समाजाच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलनाची हाक देण्यात आली. त्यानुसार आज प्रत्यक्ष आंदोलनास सुरूवातही झाली. तालुक्यातील गवळी पिंपरी येथील सोनपेठ-गंगाखेड-परळी वैजनाथ रोडवरील जिजाऊ चौकात ग्रामस्थांनी ह.भ.प.नामदेव महाराज फपाळ यांचे किर्तन व महाप्रसादाचे आयोजन केले. या रोडवर बैलगाड्या व मोटारसायकली लावून रास्तारोको करण्यात आला. तालुक्यातील उक्कडगांव मक्ता, नरवाडी, डिघोळ (दे.), शेळगांव, खपाट पिंपरी, वाणीसंगम, आवलगांव, सायखेडा आदी गावांसह अन्य ठिकाणीही  चक्काजाम, रास्तारोको, ठिय्या असे विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. वरील सर्व ठिकाणी लहान बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत महिला तसेच पूरूष हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसले. काही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने ठिक ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें