विभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी शहरातून दोन खेळाडू पात्र,मुलींनी मारली बाजी. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 25 अगस्त 2018

विभागीय बुध्दीबळ स्पर्धेसाठी शहरातून दोन खेळाडू पात्र,मुलींनी मारली बाजी.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि.२५ऑगस्ट २०१८

जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत १९वर्ष वयोगटात येथील कै.रमेश वरपुडकर कनिष्ठ महाविद्यालयाची कु. योगेश्वरी शिंदे व १७वर्षे वयोगटात व्हिजन पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी कु.आयुष्या पनुरे या दोघींंची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. परभणी येथील मनपा सभागृहात आज दि.२५ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत सदरील खेळाडूंची बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात विभागीय पातळीवर खेेळण्यासाठी पात्रता फेरी पारपडली. यात त्यांनी हे यश संपादन केले.
यशस्वी दोन्ही विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक क्रिडाशिक्षक कैलास आरबाड, विठ्ठल राठोड, सुजित माळी व रविकुमार स्वामी यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें