कौसडी:- प्रतिनिधी
जिंतुर तालुक्याती कौसडी बोरी परिसरातील शेतक-यांना बँकेतील अधिकारी पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत आसल्याने जिंतुर-सेलु मतदार संघाचे आमदार विजय भांबळे यांनी शेतक-यांना कर्ज मीळुन देण्यासाठी बँकेतील अधिका-याशी दिनांक 24 अगस्त शुक्रवार रोजी चर्चा केली.
कौसडी व बोरी सर्कल तसेच वस्सा सर्कल मधील काही गावे महाराष्ट्र ग्रामीण बँक शाख बोरी याला जोडलेली आहेत जिल्हाभरात शेतक-यांना पीक कर्जाचे वाटप केले जात आहे असे आसतांना देखील बोरी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतक-यांना पीक कर्ज वाटप करीत नसल्यांच्या तक्रारी आ.विजय भांबळे यांच्याकडे शेतक-यांनी केल्या होत्या शुक्रवार रोजी आ.विजय भांबळे यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेला भेट देऊन शाखा अधिकारी बोचरे यांच्याशी चर्चा केली जोपर्यंत शेतक-यांना कर्ज पुरवठा सुरू केला जाणार नाही तोपर्यंत बँकेत बसुन राहणार आसल्यांची भुमीका आ.भांबळे यांनी घेतली त्यामुळे अधिका-यांची नाकीनऊ झाली शाखा अधिकारी यांनी बँकेचे विभागीय व्यवस्थापक दत्तात्रय भिसे यांच्याशी चर्चा केली तसेच भिसे यांनी आ.भांबळे यांच्याशी चर्चा करून तात्काळ कर्जपुरवठा सुरू करू असे आश्वासन दिले या नंतर आ.भांबळे यांनी शेतक-यांशी चर्चा करून शेतक-यांना लवकरच पीक कर्ज उपलब्ध होतील असे आश्वासन दिले या वेळी माजी उपसभापती मोबीन कुरेशी माजी अर्जुन वजीर संजय शर्मा करून नागरे संजय देशमुख आशोकराव देशमुख यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें