सेलू :- केरळ येथील पुरग्रस्तांसाठी आज दि. 25 ऑगस्ट रोजी शहरातील क्रांती चौकातून मदत फेरी काढण्यात आली.
माणूसकीच्या नात्याने संवेदनशील सेलूकरांनी या मदत फेरीत उत्सफुर्त सहभागी होत सढळहस्ते मदत केली. शहरातील विविध शाळांतील विद्यार्थी, शिक्षक, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आदींचा सहभाग यावेळी दिसुन आला. या फेरीच्या माध्यमातून शहात्तर हजारांची रोकड जमा झाली.
तसेच समस्त सेलूकरांच्या वतीने पाच लक्ष रूपयांची मदत केरळ सरकारला पाठविण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. पैकी पहिल्या टप्प्यात पाऊण लाख जमा झाल्याचे संयोजन समितीने कळविले आहे. नगर परिषद व साईबाबा नागरी सहकारी बँकेचे कर्मचारी एक दिवसाचा पगार तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देखील ठोस मदतीचा निर्णय घेण्यात आला. या फेरीत केरळ मध्ये बळी गेलेल्या पुरग्रस्तांना श्रध्दांजली वाहण्यात आली. व राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें