सिल्लोड : प्रतिनिधी ( दि.२४ ) - अजिंठा लेणी येथे आंतरराष्ट्रीय पर्यटन विकास परिषदेच्या निमित्ताने अजिंठा लेणी येथे जात असतांना सिल्लोड शहरात नगर परिषदेच्या वतीने केंद्रीय पर्यटन माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री अल्फोंसो कंन्नथानम, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ व ऊर्जा पर्यटन व अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरेवर यांचा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्या असते अजिंठ्याच्या पद्मपाणीच्या मूर्ती प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी माजी राज्यमंत्री आ.अब्दुल सत्तार यांच्यासह मुख्याधिकारी अशोक कायंदे,उपनगराध्यक्ष शकुंतलाबाई बन्सोड, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा सिमाताई गव्हाणे, बाजार समितीचे उपसभापती नंदकिशोर सहारे, संचालक सतिष ताठे, पपींद्रापालसिंह वायटी, माजी उपनगराध्यक्ष शंकरराव खांडवे, विठ्ठलराव सपकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
अजिंठा लेणीस जागतिक पर्यटन परिषदेच्या निमित्त भेट देण्यासाठी दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय पर्यटन माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री अल्फोंसो कंन्नथानम, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावळ व ऊर्जा पर्यटन व अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरेवर यांच्या सोबत पर्यटन विभागाचे विविध विभागप्रमुख होते.ताफ्याचे सिल्लोड शहरात आगमन होताच नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्यासह मान्यवरांनी सत्कार केला.
या वेळी नगराध्यक्ष अब्दुल समीर यांनी शहरात राबविल्या जात असलेल्या विविध विकास योजनांच्या बाबतीत व शहरात राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता अभियानात नगर परिषदेच्या प्रगती दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांना माहिती दिली. माजी मंत्री आ.अब्दुल सत्तार यांनी शहराच्या विकास योजनांसह मतदारसंघात राबविण्यात आलेल्या विकास योजनांची माहिती देतांना मतदारसंघात अत्यल्प पाऊस झाल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी तातडीने सरकारच्या माध्यमातून आर्थिक मदत केली गेली पाहिजे व सिल्लोड सोयगाव तालुके दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्याची मागणी केली.
नगरसेवक रईस पठाण मुजावर, राजेंद्र गौर, शेख बाबर, अकील वसईकर, सत्तार हुसेन, राजरत्न निकम, दशरथ सुरडकर, अमित आरके, शांतीलाल अग्रवाल, दामुअण्णां गव्हाणे, संजय आरके, कुणाल सहारे, मुश्ताक देशमुख, मनोहर आरके, अशोक कांबळे, राजू साठे, सखाराम आहिरे, गणेश डकले, शेख तौसिफ, राजेश्वर आरके, अफजल बेग,रविंद्र आरके आदींची उपस्थिती होती.
सिल्लोड नगर परिषदेने केलेल्या स्वागत सन्मानचे स्वीकार करीत मंत्री जयकुमार रावल यांनी उपस्थितांचे आभार मानले .
भारत आमचा मोठा भाऊ असून आपण केलेल्या आदरातिथ्य कायम स्मरणात राहील असे गौरवोद्गार म्यानमारचे मंत्री थुरा यु औंग को यांनी यावेळी व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें