सेलू.प्रतिनिधी.
बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू तर्फे गुलाबी बोंड आळी व्यवस्थापन विषयी मानवत तालुक्यातील ईरळद मगर सावंगी मानवत रोड येथे मार्गदर्शन
सध्या कापूस पिकावर गुलाबी बोंड आळी मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाला असून तिचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बोर्डीकर कृषी महाविद्यालय सेलू येथील कृषी दूतांना गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मानवत तालुक्यातील ईरळद मगर सावंगी व मानवत रोड येथे जनजागृती व्यवस्थापनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्राध्यापक जीवी भोसले यांनी एकात्मिक पद्धतीने सामुदायिक रीत्या गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण कसे करावे यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित प्राध्यापक चव्हाण डॉक्टर युवाय पुराणिक यांची उपस्थिती होती पाने फुले लागण्याच्या अवस्थेत गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकरी आठ ते दहा कामगंध सापळे लावावेत तसेच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी अशी माहिती यावेळी कृषी तज्ज्ञांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली .

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें