ग्रंथदान करून वाढदिवस साजरा. - Tezznews24

Tezznews24

Marathi news portel

Blt add

Breaking

शनिवार, 4 अगस्त 2018

ग्रंथदान करून वाढदिवस साजरा.


सोनपेठ(राजेश खेडकर) दि. ०४अॉगस्ट २०१८
सोनपेठ शहरात वाढदिवसा निमित्त ग्रंथदानाची परंपरा कायम राखत आज येथील पत्रकार शिवमल्हार वाघे यांनी त्यांचा मुलगा चि. प्रथमेश वाघे याच्या वाढदिवसा निमित्त व्हिजन पब्लिक  स्कुल येथे गेल्यावर्षी लावलेल्या झाडांचा आज  वाढदिवस साजरा केला तर चि.प्रथमेश याच्या  वादिवसाचे औचित्य साधून यावर्षी ग्रंथदान केले. विटा रोड सोनपेठ येथील व्हिजन पब्लिक स्कूल येथे पारपडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनपेठ ग्रंथ वाचन चळवळीचे अध्यक्ष  राजेश्वर खेडकर हे होते, तर वृक्षारोपन व संवर्धन सामजिक चळवळीचे अध्यक्ष  वृक्षमित्र महेश जाधव, पत्रकार शिवमल्हार वाघे, प्राचार्य पांडुरंग दुकले ,उपप्राचार्य श्रवणकुमर मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना खेडकर यांनी पुस्तका सारखा दुसरा खरा मित्र दुसरा कोनी नसून उज्वल भविष्य घडविण्यासाठी सर्वांनी पुस्तक वाचावीत असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भगवान घाटूळ यांनी केले तर  सहशिक पप्पू पवार आभार व्यक्त केले.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें