मानवत/ मुस्तखीम बेलदार
दि.२२: मानवत येथील गोदुगल्ली येथे महिलांच्या गळ्यातील ५०४०० रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याच्या साखळीतील शार्ट गंठण चोरट्यानी हिसकावुन घेऊन मोटरसायकलवर पळुन गेल्याची खळबळजनक घटना आज दि.२२ अॉगस्ट रोजी दुपारी घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की,मानवत येथील रहिवाशी महिला सौ.शिवकन्या अक्षय मोरे वय २५ वर्ष रा. गोदू गल्ली ह्या
दुपारी २:३० वाजताच्या सुमारास बाजारात खरेदी करून घरी पायी जात होत्या व त्याच्या सोबत त्यांच्या मैञीन
ऋतुजा पाटील हि सोबत होत्या यावेळी दोन ईसम काळे टि शर्ट घातलेले व बल्यु पँन्ट घातलेले वय २५ ते २८ वर्ष विना नंबर मोटरसायकल वर मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तिचे केस वाढलेले हे मोटरसायकल वर भरधाव वेगाने समोरुन आले व त्यांनी महिलांच्या गळ्यातील गंठन ओढुन मोटरसायकल वर पळुन जात आसताना महिलांच्या हातात दोन ग्राम सोन्याचे डोरले राहिले व त्यानी घाबरून आरडाओरडा केला असता गल्लीतुन जाणारे एका व्यकतीने मदतीला येऊन पळत मोटरसायकल चा पाठलाग केला परंतु चोरटे तुटलेले गंठण घेऊन पळुन गेले या प्रकरणी सौ.शिवकन्या अक्षय मोरे यांच्या तक्रारीवरुन मानवत पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.१६०/१८ कलम ३७९ ,३४ भा.द.वि.अन्वये चोरीचा गुन्हा दाखल झाला असुन अधिक तपास बिट जमादार प्रताप साळवने हे करीत आहे.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें