(भोकरदन प्रतिनिधी)शे.सलिम.
भोकरदन शहरासह तालुक्यात बकरी ईद शांततेत व मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली.मुस्लिम समाजात इस्लामचा दुसरा सर्वात महत्वाचा सण बकरिद ईद हा आहे,त्याला ईद-उल-अजहा हा अरबी शब्द आहे. तसेच हिंदु मुस्लिम एकतेचा पैगाम या निमित्ताने देण्यात आला असुन एकमेकांना गळाभेट देवुन हिंदु -मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच बकरी ईद हा सन मोठ्या उत्साहाने व शांततेने साजरा करण्यात आला शहरातील रफिक कॉलनी येथील अबूबकर मस्जिद येथे सर्व प्रथम सकाळी 7 वाजता हाफेज अब्दुल अलीम व ईदगा मैदानावर सकाळी 8-30 वाजता हाफेज शकील अहेमद व सकाळी 9 वाजता काजी मोहल्ला येथील मरकज मस्जिद येथे मूफती खालेद साहेब आणि नवीन भोकरदन येथील नूरानी मस्जिद येथे हाफेज असद साहेब यांनी ईद उल अजहाची नमाज पठण केले व देशात शांतता नांदावी तसेच सुरक्षित राहावे अशी दुवा केली .बकरिद ईद हा सन मोठ्या उत्साहाने साजरा व्हावे या साठी पोलीस प्रशासनाने शहरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला होता.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें