भोकरदन / प्रतिनिधी
भोकरदन शहरातील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार दिंडोरी प्रणित केंद्रात बुधवारी (दिनांक २२) रोजी पवित्र श्रावण मासानिमित्त आयोजित करण्यात आलेला एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा उत्सहात संपन्न झाला.
भोकरदन शहरातील जुनी बाजार पट्टी परिसरात असलेल्या श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने हिंदू धर्मियांच्या पवित्र श्रावण महिन्यानिमित्त महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दररोजच्या नित्यसेवेसह त्रिकाल आरती, रूद्र अभिषेक व विविध सेवा रुजू करण्यात येत आहे. प.पु.गुरुमाऊली यांच्या आदेशाने बुधवारी केंद्रात एकदिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या पारायण सोहळ्यात १९४ महिला व पुरुष सेवेकरी सहभागी झाले होते. याशिवाय तालुक्यात दुष्काळ सदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक हैराण आहे. या परिस्थितीत बदल होऊन तालुक्यात विपुल प्रमाणात पर्जन्यवृष्टी व्हावी यासाठी आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने गुरुपौर्णिमेपासून केंद्रात हवनयुक्त पर्जन्यसुक्ताची सेवा रुजू करण्यात येत आहे. झालेल्या या कार्यक्रमाला महिला व पुरुष सेवेकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
फोटो: भोकरदन शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रात गुरुचरित्र पारायणाचे वाचन करतांना महिला व पुरूष सेवेकरी.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें