भोकरदन प्रतिनिधी :(शेख सलीम)
भोकरदन तालुक्यातील गोद्री येथील काही महिन्यापूर्वी गोद्रीतिल आयेशा हिचा मोटर अपघातात मृत्यू झाला होता
जि. प.सदस्य आशाताई पांडे यांच्या हस्ते मोटर अपघातात मृत्यू झालेली आयशा शेख सुभान यांच्या कुटुंबियांना ७५००० हजाराचे धनादेश देण्यात आले. विधानसभेचे आमदार संतोष दानवे यांच्या विशेष प्रयत्नाने राजीव गांधी अपघात योजने अंतर्गत ७५००० हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पा. दानवे यांचे स्वीय सहाय्यक गजानन तांदुळजे ,गोद्रीचे माजी सरपंच राजीव निकाळजे ,भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष जावेद पठाण ,सुनील निकाळजे ,पवन निकाळजे,विनोद निकाळजे ,अंकुश निकाळजे आदिंची उपस्थिती होती.

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें